तरुण फिल्म प्रोड्युसरचा अपघातात मृत्यू; अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात, मदतीऐवजी लोकांनी काढले फोटो

Last Updated:

तरुण फिल्म प्रोड्युसर अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मात्र त्याला मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. त्याऐवजी लोक फोटो काढत बसले होते.

News18
News18
दिल्ली, 02 नोव्हेंबर : दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना शमोर आलीय. एक ३० वर्षांचा तरुण फिल्म प्रोड्युसर अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मात्र त्याला मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. त्याऐवजी लोक फोटो काढत बसले होते. काही लोकांनी मदत केली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला उशिर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीयुष पाल याचा दिल्लीत अपघात झाला. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. तेव्हा लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो काढले. जवळच्याच पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आङे. पीयूष पालला एका दुसऱ्या बाईकने धडक दिली. त्यावेळी तो जमिनीवर पडला. त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना आउटर रिंग रोडवर आयआयटी क्रॉसिंगकडून नेहरू प्लेसकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री ९.४५ वाजता घडली.
advertisement
पीयूषला मदत करण्यासाठी काही जण थांबले होते. त्यापैकी एकाने सांगितलं की, तरुणाच्या डोक्यातून रक्तस्राव खूप झाला होता. तिथल्या लोकांनी तो अर्धा तास तिथेच पडला होता असं सांगितलं . काही लोकांना पीयूषला एका रिक्षात बसवून दवाखान्यात नेलं. तिथून त्याला पीएसआरआय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्यात आले. रात्री पावणे दहाला अपघात झाला, तर उपचार मिळण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले होते.
advertisement
अपघातानंतर पाऊण तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी पीयूष पालचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर पीयूषचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तरुण फिल्म प्रोड्युसरचा अपघातात मृत्यू; अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात, मदतीऐवजी लोकांनी काढले फोटो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement