ही दोस्ती तुटायची नाय! बिग बॉस जिंकल्यानंतर गौरव खन्नाचं हटके बर्थडे सेलिब्रेशन, प्रणित-मृदूलसोबत घेतलं बाप्पाचं दर्शन

Last Updated:

Gaurav Khanna Birthday: आज, ११ डिसेंबरला गौरवचा वाढदिवस आहे आणि या खास दिवशी त्याने एक अनोखं सेलिब्रेशन प्लॅन केलं!

News18
News18
मुंबई: टीव्हीवरचा सर्वात मोठा रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' जिंकून काही दिवस झाले, तरी अभिनेता गौरव खन्ना अजूनही चर्चेत आहे. आज, ११ डिसेंबरला गौरवचा वाढदिवस आहे आणि या खास दिवशी त्याने एक अनोखं सेलिब्रेशन प्लॅन केलं! 'बिग बॉस'च्या घरात त्याची खास गट्टी जमलेले त्याचे दोन जिगरी दोस्त, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी, गौरवच्या घरी हजर झाले आणि या तिघांनी एकत्र थेट मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर गाठले.
गौरव, प्रणित आणि मृदुल यांना मंदिराजवळ पाहून त्यांना फॅन्स आणि मीडियाने घेरले. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

वाढदिवशी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

गौरव खन्ना 'बिग बॉस'चा विजेता बनल्यानंतर आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी हे तिघे मंदिरात आले होते. यावेळी तिघांनीही शोमध्ये प्रेक्षकांनी जो भरभरून पाठिंबा दिला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
advertisement
मृदुल तिवारी, जो 'बिग बॉस'च्या घरात गौरवच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक होता, तो या आनंदात सहभागी झाल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या मैत्रीची झलक पुन्हा दिसली. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही जमिनीवर राहून देवाचे आभार मानण्याची या तिघांची वृत्ती पाहून फॅन्सनी त्यांचे खूप कौतुक केले.
advertisement
advertisement

बिग बॉसच्या घरात फुलली आयुष्यभराची मैत्री

गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांच्या मैत्रीची चर्चा 'बिग बॉस १९' च्या संपूर्ण सीझनमध्ये होती. शोच्या हाय-प्रेशर वातावरणातही या तिघांनी एक अस्सल आणि घट्ट मैत्री जपली. अनेक वाद-विवादांमध्ये ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे.
नुकताच गौरवने मृदुल तिवारीसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मृदुल गौरवच्या घरी जेवण करायला गेला होता आणि त्या प्रसंगाचा फोटो शेअर करताना गौरवने विनोदी कॅप्शन दिले होते. त्याने लिहिले "बिग बॉस १९ चं डायनिंग टेबलवर ते घरचा डायनिंग टेबल, एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे छोटा भाई मृदूल तिवारी."
advertisement
वाढदिवस, विजय आणि जिवलग दोस्ती – या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांची सिद्धिविनायक भेट खूप खास ठरली आहे!
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ही दोस्ती तुटायची नाय! बिग बॉस जिंकल्यानंतर गौरव खन्नाचं हटके बर्थडे सेलिब्रेशन, प्रणित-मृदूलसोबत घेतलं बाप्पाचं दर्शन
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement