'गाफिल राहू नका', गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा? अस्खलित मराठी भाषेत शेअर केला जळजळीत VIDEO

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिगना त्रिवेदीने मराठीतून राज ठाकरे यांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि मुंबईकरांना मतदानासाठी आवाहन केलं.

News18
News18
मुंबई: मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती येणार? याचा फैसला व्हायला आता काही तासच उरले आहेत. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली असताना, सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडिओ आहे लोकप्रिय गुजराती अभिनेत्री जिगना त्रिवेदी हिचा. विशेष म्हणजे, एका गुजराती अभिनेत्रीने चक्क अस्खलित मराठीतून मुंबईच्या प्रश्नांवर भाष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.

"विकासाच्या नावाखाली श्वास कोंडू नका!"

जिगना त्रिवेदीने आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या सद्यस्थितीवर अत्यंत मार्मिक भाष्य केलं आहे. ती म्हणते, "आज मुंबईचा विकास होतोय असं म्हटलं जातं, पण या विकासाच्या नावाखाली मुंबईकरांचा श्वास मात्र गुदमरतोय. रस्ते, ट्रॅफिक आणि वाढती गर्दी यामुळे मुंबईचा मूळ चेहरा हरवत चाललाय." जिगनाने यावेळी मुंबईतील वाढत्या स्थलांतराच्या मुद्द्यावरही बोट ठेवलं. मुंबई विकसित आहे म्हणून जगभरातून लोक इथे येतात, पण आता वेळ आली आहे की, जे भाग अजूनही अविकसित आहेत तिथे लक्ष दिलं जावं, जेणेकरून मुंबईवरचा ताण कमी होईल.
advertisement

जिगनाचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा

जिगनाचे अनेक गुजराती नाटकं आणि सिनेमे गाजले आहेत, पण मुंबईबद्दलचं तिचं प्रेम या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून आलं. राज ठाकरेंचं नाव थेट न घेता तिने त्यांच्या व्हिजनला पाठिंबा दिला. "महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एका 'राजा'च्या हातात असायला हवा, ज्याच्याकडे या शहराला वाचवण्याची दृष्टी आहे," असं म्हणत तिने मुंबईकरांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. मुंबईला वाचवायचं असेल, तर योग्य उमेदवाराला निवडून देणं ही आपली जबाबदारी असल्याचं तिने ठणकावून सांगितलं.
advertisement

मतदानाचं महत्त्व आणि चुरशीची लढत

उद्या, १५ जानेवारीला सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मुंबईत यंदाची निवडणूक ऐतिहासिक आहे, कारण राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. अशातच जिगनासारख्या सेलिब्रिटींनी उघडपणे आपली मतं मांडल्यामुळे मतदारांमध्ये, विशेषतः तरुण वर्गात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'गाफिल राहू नका', गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा? अस्खलित मराठी भाषेत शेअर केला जळजळीत VIDEO
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement