Housefull 5 : बिग बॉस मराठी 5 फेम अभिनेत्रीचं नशीब फळफळलं! थेट अक्षय कुमारसोबत शेअर करणार स्क्रीन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshay Kumar Housefull 5 : बिग बॉस मराठी 5 मधून महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये एक मोठा टप्प गाठला आहे. ती आता थेट अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
मुंबई : बॉलीवूडच्या कॉमेडी फिल्म्सचा किंग समजला जाणारा ‘हाऊसफुल’ हा चित्रपट सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. २०१० मध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या फ्रेंचायझीने आतापर्यंत चार सुपरहिट भाग दिले आहेत. आणि आता सहा वर्षांनंतर, ‘हाऊसफुल ५’ पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज आहे. आधीच ‘लाल परी’ या गाण्याने चाहत्यांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण केली होती, आणि आता आलेल्या नवीन गाण्यामुळे ही उत्सुकता आणखीच वाढली आहे.
‘दिल-ए-नादान’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि सोनम बाजवा यांसारख्या ग्लॅमरस ताऱ्यांची झलक पाहायला मिळते.
अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसणार बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री
संगीत, लोकेशन्स आणि कोरिओग्राफीसह गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. पण... या गाण्याचे शेवटचे काही सेकंद खूपच खास आहेत. कारण, त्या काही सेकंदांमध्ये अक्षय कुमारसोबत एक नवीन चेहरा झळकतो आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा आहे! इरिना बिग बॉसच्या घरात तिच्या मराठमोळ्या प्रेमाने आणि मनमोकळ्या स्वभावाने घराघरात पोहोचली होती.
advertisement
मूळची रशियन असलेली इरिना भारतात येऊन मराठी संस्कृतीत एकरूप झाली. इरिनानं याआधी हिंदी मालिका आणि IPL मध्ये चीअरलीडर म्हणूनही काम केलं होतं. पण आता ती थेट अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल ५’च्या गाण्यात झळकली आहे हे तिच्या करिअरसाठी एक मोठं वळण ठरणार आहे.
advertisement

गाण्याच्या शेवटी अक्षयसोबत तिचा छोटासा, पण लक्षवेधी प्रसंग दिसतो आणि त्यामुळे अनेकांच्या मनात आता एकच प्रश्न उभा राहिला आहे की इरिनाची झलक केवळ गाण्यापुरतीच आहे की सिनेमात तिची भूमिकाही पाहायला मिळेल? सध्या तरी निर्मात्यांकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण चाहत्यांनी मात्र इरिनाला ‘हाऊसफुल’ टीममध्ये पाहून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
‘हाऊसफुल ५’ या सिनेमाची अधिकृत रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही, पण त्याच्या आजवरच्या गाण्यांनी आणि स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा निश्चितच गगनाला भिडल्या आहेत. आणि या सगळ्यात इरिनाची छोटीशी झलक तिच्या मोठ्या यशाची नांदी ठरेल, यात शंका नाही!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Housefull 5 : बिग बॉस मराठी 5 फेम अभिनेत्रीचं नशीब फळफळलं! थेट अक्षय कुमारसोबत शेअर करणार स्क्रीन


