advertisement

Bhargavi Chirmule : 'ठीकय ना यार...' घटस्फोटावर स्पष्टच बोलली भार्गवी चिरमुले, म्हणते 'मी सिंगल आहे, पण...'

Last Updated:

Bhargavi Chirmule Birthday : 'अनुबंध', 'वहिनीसाहेब', 'स्वराज्य जननी जिजामाता' यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या भार्गवीने वैयक्तिक आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला आहे.

मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या भार्गवीने वैयक्तिक आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला आहे.
मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या भार्गवीने वैयक्तिक आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला आहे.
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे भार्गवी चिरमुले. आपल्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आजही आपल्या विविध भूमिकांमधून चर्चेत असते. आज तिचा 47 वा वाढदिवस! वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आयुष्याचा प्रवास पाहिला, तर तो संघर्षांनी भरलेला आहे.

वैयक्तिक आयुष्यात मोठे चढ-उतार

भार्गवीने तिच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. ‘अनुबंध’, ‘वहिनीसाहेब’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. मोठ्या पडद्यावरही तिने ‘संदूक’, ‘वन रूम किचन’, ‘लालबत्ती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली.
advertisement
मात्र, जितकं तिचं प्रोफेशनल आयुष्य यशस्वी राहिलं, तितकंच वैयक्तिक आयुष्य अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं होतं. घटस्फोट आणि वडिलांचे निधन – या दोन मोठ्या घटनांनी तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. पण, भार्गवी या संघर्षातून स्वतःला सावरत पुढे जात राहिली.

"मी सिंगल आहे, पण मी आनंदी आहे!"

एका मुलाखतीत भार्गवीने तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल उघडपणे सांगितलं. ती म्हणाली, "माझ्या वडिलांचं जाणं आणि घटस्फोट – हे दोन्ही प्रसंग माझ्यासाठी खूप अवघड होते. पण मी कधीही थांबले नाही. मी काम करत राहिले. आता मागे वळून पाहताना वाटतं, ‘ठीक आहे, मी सिंगल आहे, पण मी आनंदी आहे!’ मी हवं ते काम करतेय, माझ्या मनाप्रमाणे जगतेय. मला कोणत्याच गोष्टीची भीती उरलेली नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bhargavi Chirmule : 'ठीकय ना यार...' घटस्फोटावर स्पष्टच बोलली भार्गवी चिरमुले, म्हणते 'मी सिंगल आहे, पण...'
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement