जे अमिताभला जमलं नाही ते काजोलने करून दाखवलं, दुर्गा पंडालमध्ये दिसलं जया बच्चन यांचं वेगळंच रुप; VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jaya Bachchan Durga Pandal Video : नेहमी रागात असलेल्या जया बच्चन पहिल्यांदा खळखळून हसताना दिसल्या. त्यांचा निरागस अंदाज पाहून सगळेच अवाक् झालेत.जया यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई : अभिनेत्री जया बच्चन आणि पापाराझींचं नेहमीच बिनसलेलं असतं. पापाराझींना पाहिलं की एक वेगळ्याच जया बच्चन पाहायला मिळतात. पण पहिल्यांदा असं झालंय की पापाराझींसमोर जया बच्चन यांनी फोटोसाठी पोझ दिल्या. फक्त पोझ दिल्या नाही तर त्या खळखळून हसल्या. त्यांचा तो निरागसपणा कॅमेरात कैद झालाय. जया यांना पहिल्यांदा असं पाहून सगळेच भारावून गेले. जया बच्चन यांचं हे वेगळं रूप फक्त काजोलमुळे पाहायला मिळालं. जे अभिताभ बच्चनला जमलं नाही ते काजोलनं करून दाखवलं. या ऑनस्क्रिन सासू सुनांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.
उत्तर मुंबईतील दुर्गा पूजा पंडालमध्ये अनेक सेलिब्रेटी हजेरी लावतात. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन देखील पंडालमध्ये पोहोचल्या होत्या. पंडालमध्ये गेल्यानंतर त्यांनी काजोलसोबत फोटो काढले. तिथे असलेल्या सगळ्या पापाराझींसमोर जया बच्चन उभ्या राहिल्या.
advertisement
काजोलने जयाला दिली एकटीने पोज
पूजेनंतर जया बच्चन लाल रेशमी साडीत पंडालमध्ये उभ्या होत्या. त्यावेळी काजोलने पॅपराझी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. थोड्या वेळाने दोघींनी एकत्र पोज दिली. नंतर काजोलने लहान मुलासारखे हावभाव करून जया यांना एकटीने पोज देण्यास सांगितले. एवढंच नाही तर काजोलने टाळ्या वाजवत जयाला हसण्यास भाग पाडलं. जया बच्चन देखील खळखळून हसल्या. नेहमी रागीट वाटणाऱ्या जया बच्चनचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला.
advertisement
जया बच्चनचा पारंपारिक लूक
जया बच्चनचा लूक चाहत्यांच्या नजरेत भरला. तिने लाल रेशमी साडी नेसली होती, ज्यावर सुंदर सोनेरी जरी बॉर्डर आणि फुलांची डिझाईन होती. केसांमध्ये लाल गुलाब लावला होता. रुबी आणि हिऱ्याचे दागिने, ब्रेसलेट आणि घड्याळामुळे त्यांचा लूक अधिक खुलून दिसत होता. कपाळावरची लाल टिकली त्यांच्या सौंदर्यात भर टाकत होती.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर भन्नाट रिअॅक्शन
जया बच्चन हसतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, "ही खरी जया बच्चन नाही, ही तिची AI version आहे!" तर दुसऱ्याने म्हटलं, "काजोलने ते केलं जे दुसरं कोणीही करू शकलं नाही, तिने जयाजींना खळखळवून हसवलं." काहींनी तर त्यांची ही जोडी पाहून "कभी खुशी कभी गम" सिनेमातील सासू-सुनेच्या नात्याची आठवण काढली.
advertisement
काजोलचा ग्लॅमरस अंदाज
या प्रसंगी काजोल देखील खूपच सुंदर दिसत होती. तिने सोनेरी भरतकाम असलेली टिशू साडी, स्लीव्हलेस ब्लाउज आणि लाल बांगड्या वेअर केल्या होत्या. फुलांचे कानातले आणि स्टायलिश बनमुळे तिचा लूक पारंपारिक आणि थोडा स्टायलिशही वाटत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जे अमिताभला जमलं नाही ते काजोलने करून दाखवलं, दुर्गा पंडालमध्ये दिसलं जया बच्चन यांचं वेगळंच रुप; VIDEO