'नेक्स्ट फिल्म आली की सांग', आपलाच रेकॉर्ड मोडणाऱ्या चिमुकल्या त्रिशा ठोसरचे फॅन झाले कमल हासन, VIDEO CALL VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
kamal hassan video call to trisha thosar : 'नाळ 2' मधील तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच शिवाय इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्रिशानं थेट सुपरस्टार कमल हासन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
मुंबई : नुकताचं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'नाळ 2' या मराठीचं सिनेमाचं कौतुक झालं. सिनेमातील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप या तीन बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या तिघांमध्ये छोट्या त्रिशा ठोसरनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्रिशा साडी नेसून राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी पोहोचली होती. 'नाळ 2' मधील तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच शिवाय इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्रिशानं थेट सुपरस्टार कमल हासन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
अभिनेते कमल हासन यांनी त्रिशासाठी खास पोस्ट लिहून तिचं कौतुक तर केलंच शिवाय त्यांनी तिला व्हिडीओ कॉल देखील केला. व्हिडीओ कॉल करत त्यांनी त्रिशाचं कौतुक केलं. कमल हासन त्रिशाचे फॅन झाले. तुझा पुढचा सिनेमा कधी येणार मला सांग असं म्हणत त्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं. कमल हासन यांनी त्रिशाला खूप आशीर्वाद दिले. कमल हासन आणि त्रिशाचा व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
कमल हासन यांनी त्रिशाला व्हिडीओ कॉल केला. ते तिला म्हणाले, "हाय त्रिशा, माझं नाव कमल हासन". "येस सर, आय नो ( हा सर मला माहितीये) " असं त्रिशा म्हणाली. ते तिला म्हणाले, "मी पाहिलं तुला अवॉर्ड मिळाला, तुझं खूप खूप अभिनंदन". त्यावर त्रिशा त्यांना "थँक्यू सर" म्हणाली.
advertisement
कमल हासन यांनी त्रिशाला विचारलं, "आता तू काय करतेस, कोणता सिनेमा करत आहेस" त्यावर त्रिशा म्हणते, "महेश मांजरेकर सर मुव्ही." कमल हासन म्हणतात, "ते खूप ग्रेट डायरेक्टर आहेत, माझे खूप चांगले मित्र आहेत. तुझा पुढचा सिनेमा करशील तेव्हा मला मेसेज कर, टचमध्ये राहा. सिनेमातील सगळ्या मुलांना खूप खूप आशीर्वाद."
advertisement
त्यानंतर कमल हासन त्रिशाच्या आईशीही बोलले. त्यांनी तिला सांगितलं, "हे स्पेशल टॅलेन्ट आहे, सगळ्यांकडे नसं. आशीर्वादासोबत तिला ट्रेनिंगचीही गरज आहे. आम्हाला सांगा तिला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणखी काय करता येईल आम्ही मदत करू."
त्रिशा ठोसरच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्रिशा आता अवघ्या 6 वर्षांची आहे. या वयात तिनं मोठं यश मिळवलं आहे. तिला यंदाचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्काराही मिळाला आहे.
advertisement
त्रिशाने मोडला कमल हासन यांचा रेकॉर्ड
कमल हसन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी 'कलाथुर कन्नम्मा' हा त्यांचा पहिला सिनेमा केला होता. या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बालकलाकार होते. त्यांचा हा रेकॉर्ड 65 वर्ष तसाच टिकून होता. आज तो मराठमोळ्या त्रिशा ठोसरनं मोडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'नेक्स्ट फिल्म आली की सांग', आपलाच रेकॉर्ड मोडणाऱ्या चिमुकल्या त्रिशा ठोसरचे फॅन झाले कमल हासन, VIDEO CALL VIRAL