Video: लगीन घटीका समीप आली! पार पडलं कोकणहार्टेड गर्लचं पहिलं केळवण, खास उखाण्याने वेधलं लक्ष
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काही दिवसांपूर्वी अंकिताच्या लग्नाची पत्रिका समोर आली होती. तिच्या लग्नाची खास पत्रिका तुफान व्हायरल झाली. नुकतंच तिचं पहिलं केळवणही पार पडलं आहे.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कोकण हार्टेड गर्ल आता महाराष्ट्र हार्टेड गर्ल झाली आहे. शो संपताच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या लग्नाची पत्रिका समोर आली होती. तिच्या लग्नाची खास पत्रिका तुफान व्हायरल झाली. नुकतंच तिचं पहिलं केळवणही पार पडलं आहे.
अंकिता आणि कुणालसाठी तिच्या घरच्यांनी केळवणाचे आयोजन केले होते. यावेळी अंकिताने लाल रंगाची सिंपल कॉटन साडी नेसली होती. तर कुणालने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट सदरा घातला होता. अंकिता-कुणालच्या केळवणासाठी तिच्या घरच्यांनी खास सजावट केली होती. यावेळी हे जोडपं अतिशय आनंदी दिसत होतं.
जेवण सुरू होण्याआधी घरच्यांनी या जोडप्याला उखाणं घेण्याचा आग्रह केला. त्यावर हे जोडपं पुरतं गोंधळलं. अंकिताने उखाण्याची कोणतीही तयारी केली नव्हती. पण तिने ताबडतोब जबरदस्त उखाणा घेतला. ती म्हणाली, "समोर आहे बासुंदी, खायची झालीय मला घाई, कुणालचं नाव घेते, सुरु झाली लगीनघाई." अद्याप अंकिताने तिच्या लग्नाची तारिख समोर आणली नाहीय.
advertisement
advertisement
अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी ''आनंदवारी'' हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळख होते. दरम्यान, गेल्याच आठवड्यात अंकिताने आलिशान कार घेतली आहे. या कारची किंमत ७० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Video: लगीन घटीका समीप आली! पार पडलं कोकणहार्टेड गर्लचं पहिलं केळवण, खास उखाण्याने वेधलं लक्ष