दीपिकाच्या '8 तास शिफ्ट' डिमांडला आणखी एका अभिनेत्रीचा पाठिंबा! म्हणाली, 'आम्हालाही वीक ऑफ हवा'

Last Updated:

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. तिला अलीकडेच "स्पिरिट" आणि "कल्की 2898 एडी" च्या सिक्वेलमधून वगळण्यात आलं.

दीपिकाच्या '8 तास शिफ्ट' डिमांडला आणखी एका अभिनेत्रीचा पाठिंबा!
दीपिकाच्या '8 तास शिफ्ट' डिमांडला आणखी एका अभिनेत्रीचा पाठिंबा!
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. तिला अलीकडेच "स्पिरिट" आणि "कल्की 2898 एडी" च्या सिक्वेलमधून वगळण्यात आलं. यामागचं कारण दीपिकाने निर्मात्यांकडे दररोज फक्त आठ तास काम करण्याची मागणी केली होती. या कारणामुळे तिला चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी समोर आली आणि इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली. दीपिकानंतर आणखी एका अभिनेत्रीने वीक ऑफची मागणी केली आहे.
या प्रकरणावर आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने आपले मत मांडले आहे. तिने दीपिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. न्यूज 18 शी बोलताना कोंकणा म्हणाली, "फिल्म इंडस्ट्रीत एक ठराविक व्यवस्था असली पाहिजे. कलाकार हे माणूस आहेत, मशीन नाहीत. आपण डॉक्टर किंवा न्यूरोसर्जन नाही, ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत सतत काम करावं लागतं. त्यामुळे मर्यादित कामाचे तास असणे अत्यावश्यक आहे."
advertisement
कोंकणा पुढे म्हणाली, "जर एखाद्या निर्मात्याने प्रकल्पात पैसे गुंतवले असतील, तर ते आपले काम वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवतात, हे योग्य आहे. पण कलाकारांनाही ब्रेक, विश्रांती आणि वैयक्तिक वेळ गरजेचा असतो. 12 तासांची शिफ्ट अनेकदा 14-15 तासांपर्यंत वाढते, जे आरोग्यासाठीही चांगले नाही."
advertisement
तिने पुढे म्हटलं, "इंडस्ट्रीने कलाकारांसाठी आठ तासांचे कामाचे नियम आणि आठवड्यातून एक सुट्टीचा दिवस निश्चित केला पाहिजे. यामुळे कामाची गुणवत्ता सुधारेल आणि कलाकार मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतील".
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दीपिकाच्या '8 तास शिफ्ट' डिमांडला आणखी एका अभिनेत्रीचा पाठिंबा! म्हणाली, 'आम्हालाही वीक ऑफ हवा'
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement