90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या चर्चांनंतर सोडली इंडस्ट्री, आता जगतेय 'असं' आयुष्य

Last Updated:

Bollywood Actress : 90 च्या दशकातील एका अभिनेत्रीचं अंडरवर्ल्ड डॉनसोबत नाव जोडले गेलं होतं. इतकेच नाही तर ड्रग माफियाशी लग्न केल्याच्या चर्चाही समोर आल्या. पण या सर्व चर्चांनंतर मात्र या अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

News18
News18
Bollywood Actress : 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट आणि डान्स नंबर देणारी अभिनेत्री सलमान खान, गोविंदा ते शाहरुख खानसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. आपल्या सौंदर्याने सगळ्यांना वेड लावल्यानंतर ती अनेक वर्षे इंडस्ट्री आणि लाइमलाइटपासून दूर राहिली. 24 वर्षांनंतर जेव्हा ती भारतात परतली, तेव्हा महाकुंभ 2025 मध्ये तिला किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर म्हणून घोषित करण्यात आले. कधीकाळी ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपल्या अदा आणि नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली ममता कुलकर्णी यांनी आता संन्यास घेतला असून, संसारिक मोह-माया या गोष्टींचा त्याग करुन आता ती साधं आयुष्य जगत आहे.
advertisement
अंडरवर्ल्डशी होते अभिनेत्रीचे संबंध?
ममता कुलकर्णी यांनी 1992 मध्ये ‘तिरंगा’ या चित्रपटातून पदार्पण केले. ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘बाजी’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि एडिटर-इन-चीफ रजत शर्मा यांच्या प्रसिद्ध टीव्ही शो ‘आप की अदालत’मध्ये ममता कुलकर्णी यांना विचारण्यात आले होते की 2013 मध्ये त्यांनी बॉलीवूड सोडून ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे. यावर त्यांनी सांगितले की या सगळ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच ड्रग्स प्रकरणात आपला कोणताही सहभाग नव्हता, आपल्याला गोवण्यात आले होते आणि दाऊद इब्राहिमशी आपले कोणतेही नाते नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
ड्रग माफियाची पत्नी होती ही अभिनेत्री?
2000 नंतर ममता कुलकर्णी 2016 मध्ये पुन्हा चर्चेत आल्या. जेव्हा त्यांच्या कथित पती विक्की गोस्वामी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला. ड्रग तस्करीप्रकरणी ममता कुलकर्णी यांचाही सहभाग असल्याचे सांगितले गेले आणि त्या 12 वर्षे तुरुंगात होत्या. याच मुलाखतीत ममतांनी आपल्या प्रेमाची कबुली देत सांगितले होते की हो, विक्की गोस्वामीवर त्यांचे प्रेम होते.
advertisement
ममता कुलकर्णी यांनी बॉलीवूड का सोडले?
ड्रग्स प्रकरणात नाव आल्यावर ममता कुलकर्णी यांनी केवळ बॉलीवूडच नाही तर भारतही सोडला. रजत शर्मा यांनी त्यांना अचानक बॉलीवूडमधून गायब होण्यामागचे कारण विचारले असता ममता कुलकर्णी म्हणाल्या,“मला अचानक असे वाटू लागले की बॉलीवूड इंडस्ट्री माझ्यासाठी पूर्णपणे एक भ्रम आहे, जणू मायेचे जाळे. लोक झगमगाटाच्या मागे धावत राहतात. त्याच वेळी मला जाणवले की आता बॉलीवूड सोडायला हवे.”
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या चर्चांनंतर सोडली इंडस्ट्री, आता जगतेय 'असं' आयुष्य
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement