Dashavatar Movie : 'त्यांना हॅट्स ऑफ...!', राज ठाकरेंच्या पत्नीलाही दशावतारची भुरळ, कौतुक करत म्हणाल्या, 'दिलीप काका...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Movie Dashavatar : नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं, आणि आता त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे, आणि तो चित्रपट आहे दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकत आहे. केवळ कलाकारच नाही, तर आता राजकीय नेतेही हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहेत. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं, आणि आता त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही हीच प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप प्रभावळकरांचं काम पाहून भारावल्या शर्मिला ठाकरे
‘दशावतार फिल्म्स’ या इंस्टाग्राम अकाउंटवर शर्मिला ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “आताच मी ‘दशावतार’ सिनेमा पाहिला. मला असं वाटतं की, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.”
शर्मिला यांनी पुढे सांगितलं, “राजचं जे म्हणणं असतं आणि त्याच्या भाषणात देखील अनेकदा त्याने सांगितलंय की, कोकणातील जमिनी आपण विकू नयेत. यामुळे निसर्गाची सुद्धा वाट लागतेय, हा संदेश सिनेमातून देण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येकाने पाहायला पाहिजे असा हा सिनेमा आहे.”
advertisement
त्यांनी दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “मी दिलीप काकांना मनापासून नमस्कार करेन. माझ्या वडिलांच्या काळापासून ते काम करतायत. आता त्यांचं वय ८०च्या पुढे असेल. पण त्यांची एनर्जी कमाल आहे. त्यांनी इतकं अप्रतिम काम केलंय की, माझ्याकडे शब्दच नाहीयेत. त्यांना मेकअपला एक-दोन तास लागले असणार… हॅट्स ऑफ! त्यांना”
advertisement
advertisement
सिनेमातील कोकण पाहून तृप्त झालो!
शर्मिला यांनी चित्रपटातील इतर कलाकारांचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, दिग्दर्शक सुबोध भावेने कोकणात खूप छान शूटिंग केलं आहे. सिनेमातील कोकण पाहूनच त्या खूप खुश झाल्या.
‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवर १२ दिवसांत १९ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar Movie : 'त्यांना हॅट्स ऑफ...!', राज ठाकरेंच्या पत्नीलाही दशावतारची भुरळ, कौतुक करत म्हणाल्या, 'दिलीप काका...'