Success Story: पतीची नोकरी गेली, शेतात कामे केली, राजश्री यांनी उभारली कंपनी, वर्षाला आता 25 कोटींचा टर्नओव्हर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
तुमच्या मनात स्वप्नांप्रती जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी असेल, तर काहीही अशक्य नाही. राजश्री गागरे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे.
advertisement
मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेल्या आणि सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या राजश्री गागरे यांनी शेतकरी महिला ते जर्मन कंपनीची मालकीण होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी आहे. राजश्री गागरे यांचा प्रवास एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा आहे. या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
याच दरम्यान, एक जर्मन बुडीत कंपनी विक्रीस निघाली होती. राजश्रींनी या संधीचा फायदा घेतला आणि ती कंपनी 2010 साली विकत घेतली. विशेष म्हणजे ही कंपनी आशियातील पहिली चुंबक बनवणारी जर्मन कंपनी आहे. मग्नाप्लास्त टेक्नोलॉजी कंपनीत सध्या सुमारे 120 पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 25 कोटींपेक्षा जास्त आहे.
advertisement
राजश्री गागरे महिलांसाठी देखील काम करत आहेत. त्यांनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था स्थापन केली असून या संस्थेमार्फत अनेक उद्योजिका घडवल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये जे.आर.डी. टाटा उद्योग सखी पुरस्कार, द प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.