अक्षय खन्नाचे यापेक्षा मोठे कौतुक होऊ शकत नाही, Dhurandhar साठी मिळाली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट, बलुच नेता म्हणाला- तो आमच्या सारखा दिसतो

Last Updated:

Dhurandhar: बॉलिवूडच्या Dhurandhar चित्रपटाने बलुचिस्तानातील अत्याचारांचे वास्तव अधोरेखित केल्याबद्दल Mir Yar Baloch यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, कलाकारांच्या अभिनयाचे आणि बलुच संस्कृतीच्या सन्मानपूर्वक मांडणीचे कौतुक केले आहे.

News18
News18
मुंबई: बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा असलेल्या 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावरही वादळ निर्माण केले आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेली रहमान डकैत ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे.
advertisement
इतक नाही तर चित्रपट विशेषतः बलुचिस्तानमधील (Balochistan) गंभीर आणि संवेदनशील विषयाला हात घालत असल्याने त्याची दखल घेतली जात आहे. बलुचिस्तानमधील कार्यकर्त्यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. बलुच अधिकार चळवळीतील प्रमुख आवाजांपैकी एक असलेल्या मीर यार बलोच (Mir Yar Baloch) यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चित्रपटाचा प्रभाव भारत नाही तर थेट बलुचिस्तानपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येते.
advertisement
पाकिस्तानच्या दडपशाहीचा मुद्दा 
मीर यार बलोच यांनी आपल्या पोस्टमध्ये 'धुरंधर' चित्रपटाच्या सकारात्मक पैलूंना ठळकपणे अधोरेखित केले आहे. या चित्रपटात पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये चालवलेला अन्याय आणि दडपशाही (Oppression and Injustices) याकडे थेट लक्ष वेधण्यात आले आहे. बलोच लोकांवर होणारे अत्याचार आणि त्यांना सोसावा लागणारा संघर्ष मुख्य प्रवाहातील एका मोठ्या चित्रपटात दाखवला जाणे, हे या विषयाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बलोच चळवळीच्या समर्थनासाठी हा चित्रपट एक प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे बलोच यांचे मत आहे.
advertisement
अक्षय खन्नाची 'हुबेहूब' झलक
चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या भूमिकेचे आणि लूकचे विशेष कौतुक झाले आहे. मीर यार बलोच यांनी नोंदवले आहे की, अक्षय खन्नाने पारंपरिक बलोची सांस्कृतिक वेशभूषा (Traditional Balochi Cultural Attire) परिधान केली असून, तो हुबेहूब बलोची व्यक्तीसारखा दिसत आहे.
advertisement
अक्षय खन्नाने केलेली ही व्यक्तिरेखा केवळ अभिनयाच्या दृष्टीने नव्हे, तर सांस्कृतिक प्रतिनिधित्व (Cultural Representation) म्हणूनही प्रभावी ठरली आहे. एका मुख्य प्रवाहातील अभिनेत्याने बलोची संस्कृतीला दिलेले हे महत्त्व, बलोच समुदायासाठी अभिमानास्पद असल्याचे या पोस्टमधून स्पष्ट होते.
advertisement
advertisement
सर्व कलाकारांचे कौतुक
या चित्रपटात केवळ अक्षय खन्नाच नाही, तर संपूर्ण कलाकारांच्या चमूने उत्कृष्ट अभिनय (All Cast Played Well) केला आहे, असेही मीर यार बलोच यांनी नमूद केले आहे. चित्रपटाचा विषय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. दमदार विषय आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळेच 'धुरंधर' हा चित्रपट बलुचिस्तानमधील परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करतो.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अक्षय खन्नाचे यापेक्षा मोठे कौतुक होऊ शकत नाही, Dhurandhar साठी मिळाली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट, बलुच नेता म्हणाला- तो आमच्या सारखा दिसतो
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement