'मी अनेक वर्ष हेच सांगत होतो...', राज ठाकरेंनी पाहिला 'दशावतार'; केलं दिग्दर्शकाचं कौतुक

Last Updated:

Raj Thackeray Praised Dashavatar Marathi Movie : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचं कौतुक करत पाठ थोपटली आहे.

News18
News18
मुंबई : दशावतार या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. सुबोध खानोलकर यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमाचं प्रेक्षकांकडून, समीक्षकांकडून कौतुक होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांची कौतुक करत पाठ थोपटली आहे.
राज ठाकरे यांनी नुकताच दशावतार सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी म्हटलं, "या सिनेमातून एका गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. अनेक वर्षे मी माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो आहे की, आपल्या जमिनी वाचवा. कारण जमीनच तुमचं अस्तित्व आहे."
advertisement

दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं कौतुक 

राज ठाकरे म्हणाले, "खरंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. फक्त एकट्या कोकणातच ही गोष्ट आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्रातल्या अनेक जमिनींचा विषय सुबोध खानोलकरने अत्यंत चालाखीने हा विषय सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे. दशावतारच्या सर्व रुपातून त्याते ती कथा आणली आहे. मी काय सिनेमाची कथा सांगत नाहीय. पण एक उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध असला तरी संपूर्ण महाराष्ट्राने यातून बोध घ्यावा असा हा सिनेमा आहे."
advertisement

सिनेमातील कलाकारांचं राज ठाकरेंकडून कौतुक 

राज ठाकरे यांनी सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, "दिलीप प्रभावळकरांनी उत्तम काम केलं आहे हे अत्यंत थोटं वाक्य आहे. कारण ते खूप मोठे आहेत. कमाल केलीये त्यांनी. महेश मांजरेकरने उत्तम काम केलं आहे. साजेसं काम केलं आहे. प्रियदर्शिनी त्यांनीही सुंदर, चांगलं काम केलं आहे."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by @dashavatarfilm



advertisement

राज ठाकरेंकडून सिनेमा पाहण्याचं आवाहन 

राज ठाकरे म्हणाले, "या सिनेमात एंटरटेनमेंट आहेच पण म्हणून हा सिनेमा न पाहता त्यात महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या सिनेमाने हात घातला आहे. त्यासाठी हा सिनेमा महाराष्ट्राने नक्की पाहिला पाहिजे."
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी अनेक वर्ष हेच सांगत होतो...', राज ठाकरेंनी पाहिला 'दशावतार'; केलं दिग्दर्शकाचं कौतुक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement