देशातला सर्वात लोकप्रिय अभिनेता कोण? सलमान-शाहरुख पडलेत मागे, ही घ्या Top 10 स्टार्सची लिस्ट

Last Updated:

Top 10 Stars In India : 'ऑरमॅक्स'ने ऑक्टोबर महिन्यात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या 'टॉप 10' कलाकारांची यादी जाहीर केली आहे. यात यादीत बॉलिवूडसह दाक्षिणात्य कलाकारांचा समावेश आहे.

News18
News18
Top 10 Stars : बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानसह साऊथमधील प्रभास ते अल्लू अर्जुनपर्यंत अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. पण ऑक्टोबर महिन्यातील सर्वात महागडा अभिनेता कोण? हे तुम्हाला माहिती आहे का? ओरमॅक्सने ऑक्टोबर महिन्यातील 'टॉप 10' सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत साऊथच्या कलाकारांनी बाजी मारल्याचं दिसत आहे. तर बॉलिवूडच्या फक्त दोन कलाकारांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. ऑरमॅक्सने 20 नोव्हेंबर 2025 रोजी ऑरमॅक्स स्टार्स इंडिया: मोस्ट पॉप्युलर स्टार इन इंडिया (ऑक्टोबर 2025) जाहीर केलं आहे.
ऑरमॅक्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रभासने प्रेक्षकांच्या मनावर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे ऑरमॅक्सच्या यादीत आठ साऊथ स्टारचा दबदबा आहे. तर बॉलिवूडच्या शाहरुख खान आणि सलमान खानलाच फक्त या यादीत स्थान मिळवता आले आहे.
कोणता सेलिब्रिटी कोणत्या स्थानी?
1) प्रभास (Prabhas)
advertisement
2) विजय (Vijay)
3) अल्लू अर्जुन (Allu Arjun)
4) शाहरुख खान (Shah Rukh Khan)
5) अजित कुमार (Ajith Kumar)
6) ज्युनियर एनटीआर (JR. NTR)
7) महेश बाबू (Mahesh Babu)
8) राम चरण (Ram Charan)
9) पवण कल्याण (Pawan Kalyan)
10) सलमान खान (Salman Khan)
देशातला सर्वात लोकप्रिय अभिनेता ठरलाय प्रभास
प्रभासचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नईमध्ये एका फिल्मी कुटुंबात झाला. डीएनआर शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर हैदराबादमधील चैतन्य कॉलेजमधून प्रभासने बी.टेक मध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. प्रभासने 2002 मध्ये 'ईश्वर' या तेलुगु चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पण 2004 मध्ये आलेल्या 'वरशम' या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. गेल्या 23 वर्षांपासून साऊथ सुपरस्टार इंडस्ट्रीत सक्रीय आहे.
advertisement
प्रभास आज फक्त देशातील नव्हे तर जगभरातील लोकप्रिय कलाकारांमध्ये एक आहे. आजवर त्याने 27 चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यातील अनेक चित्रपट सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर ठरले आहेत. प्रभास आज पॅन-इंडिया स्टार आहे. परदेशातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रभास आजच्या घडीच्या प्रत्येक चित्रपटासाठी 140 ते 200 कोटी रुपये मानधन घेतो. प्रभासची एकूण नेटवर्थ 250 ते 334 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
देशातला सर्वात लोकप्रिय अभिनेता कोण? सलमान-शाहरुख पडलेत मागे, ही घ्या Top 10 स्टार्सची लिस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement