advertisement

sandeep maheshwari : मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी भडकला Carry Minati वर, नेमकं काय घडलं?

Last Updated:

संदीप माहेश्वरीने मात्र कॅरीच्या या व्हिडीओवर तिखट शब्दात कमेंट केली. तो आनंदी नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं,

News18
News18
मुंबई, 25 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजन करणारे अनेक व्हिडिओ सातत्यानं शेअर होत असतात. काही कलाकार एखादी व्यक्ती, विषयावर विडंबनात्मक भाष्य करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. यातून बऱ्याचदा संबंधित व्यक्तीचं मन दुखावलं जाण्याची शक्यता असते. सध्या अनेक जण मोटिव्हेशन अर्थात प्रेरणा मिळावी याअनुषंगाने भाष्य करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. काही कलाकार अशा व्यक्तींचं विडंबन करणारे व्हिडिओ शेअर करतात. सध्या प्रसिद्ध यू-ट्यूबर कॅरी मिनाटीचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. कॅरी मिनाटीने मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीचं विडंबन केलं आहे. यावर नेटिझन्समधून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
प्रख्यात यू-ट्यूबर कॅरी मिनाटीने त्याच्या खास विनोदी शैलीत मोटिव्हेशनल स्पीकर्सचं विडंबन केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मोटिव्हेशनल स्पीकर पॅरडी, कॅरी मिनाटी असं टायटल देण्यात आलं आहे. मोटिव्हेशनल स्पीकर्स सामान्यतः ज्या शब्दांचा वापर करून लोकांना प्रेरणा देतो, अशा शब्दांचा, वाक्प्रचारांचा वापर विनोदी शैलीत केल्याचं या विडंबनात्मक व्हिडिओत पाहायला मिळतं.
advertisement
व्हिडिओच्या सुरुवातीला कॅरी मिनाटी 'कोणतीही कारणं नकोत, पुढाकार घ्या, तुमच्या आवडीचं अनुसरण करा' अशी परिचित वाक्यं वापरतो. सुरुवातीला तो प्रेरक बोलणार असं प्रेक्षकांना वाटतं; पण व्हिडिओ जसजसा पुढे जातो, तसं कॅरी मिनाटी कोणतंही प्रेरक भाषण देत नसून, मोटिव्हेशनल स्पीकर्सच्या शैलीचं विडंबन करत आहेत असं दिसतं. तो विडंबनात्मक शैलीतून मोटिव्हेशनल स्पीकर्सचे वाभाडे काढताना दिसतो. या वेळी कॅरी रणवीर अल्लाबाडिया, संदीप माहेश्वरी यांच्या शैलीवर विडंबन करताना पाहायला मिळतं. या व्हिडिओवर संदीप माहेश्वरीसह नेटिझन्सनी कमेंट्स केल्या आहेत. काही नेटिझन्सनी कॅरीच्या बाजूने, तर काहींनी विरोधात कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
या संपूर्ण व्हिडिओत कॅरी मिनाटी वारंवार विविध विषयांचा अभ्यास करा असं सांगताना प्रेरक वक्ता बनवण्याच्या साधेपणापासून ते विंझो प्लॅटफॉर्मवर गेमिंगचे फायदे सांगण्यापर्यंत, तसंच स्कॅम कॉल हातळण्याच्या महत्त्वावर जोर देतो. तसंच तो श्रोत्यांसोबतचे प्रेरक वक्त्यांचे संवाद विडंबनात्मक शैलीत मांडतो. हा व्हिडिओ नेटिझन्सचं चांगलं मनोरंजन करणारा आहे.
advertisement
कॅरी मिनाटीने रणवीर अल्लाबाडियाचं विडंबन केलं तेव्हा रणवीर अतिशय कूल होता. तो शांत राहिला, त्याने या विडंबनावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे, संदीप माहेश्वरीने मात्र कॅरीच्या या विडंबनावर तिखट शब्दात कमेंट केली. तो आनंदी नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. कमेंट करताना संदीपने लिहिलं आहे, की 'माझं विडंबन केलंस ते ठीक आहे; पण माझ्या ऑडियन्सला वावगं बोललास, ते स्वीकारार्ह नाही. त्यामुळे निराशा झाली आहे.' नेटिझन्सकडूनही कॅरीच्या व्हिडिओवर संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काही जण संदीप माहेश्वरींना हा व्हिडिओ गंमत म्हणून घ्या असं सुचवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
sandeep maheshwari : मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी भडकला Carry Minati वर, नेमकं काय घडलं?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement