मु्न्ना आणि सर्किट पुन्हा थिएटर गाजवणार! अरशद वारसीने 'मुन्ना भाई 3'बाबत दिली मोठी हिंट

Last Updated:

Munna Bhai 3 : राज कुमार हिरानी आमि संजय दत्त यांच्या 'मुन्ना भाई MBBS' या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. अशातच आता अरशद वारसीने 'मुन्ना भाई 3' बाबत संकेत दिला आहे.

News18
News18
Munna Bhai 3 : राजकुमार हिरानींचा 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘मुन्ना भाई’ हा चित्रपट आजही लोकांना खूप आवडतो. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली होती. संजय दत्त आणि अरशद वारसी या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. अलीकडेच अरशद वारसीने ‘मुन्ना भाई 3’ संदर्भात एक हिंट दिली आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अरशदने संजय दत्तसोबतच्या आपल्या कामाचा अनुभव सांगितला. त्यावेळी अरशद वारसी म्हणाला,“संजू कमालचा अभिनेता आहे. त्याच्यात खूप वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे. त्याच्यासोबत राहणं खूप मजेदार असतं. मला स्क्रिप्ट लक्षात ठेवायला नेहमी अडचण येते, पण संजूमुळे मला कथा लक्षात ठेवावी लागायची, कारण तो सेटवर येऊन विचारायचा ,‘भाई, आज आपण कोणता सीन करतोय?".
'मुन्ना भाई 3'वर काम करतायत राज कुमार हिरानी
अरशद पुढे म्हणाला,“मी संजूलाच सांगायचो की काल आपण हा सीन केला आणि आज आपण हा सीन करणार आहोत.” ‘मुन्ना भाई 3’ बाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत अरशद म्हणाला,“आधी ‘मुन्ना भाई 3’ बाबत काहीही घडामोड घडत नव्हती. पण आता राजकुमार हिरानी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत. ते यावर खूप मेहनत घेत आहेत".
advertisement
अरशद म्हणाला,"मला असं वाटतंय की आता 'मुन्ना भाई 3' हा चित्रपट नक्कीच बनला पाहिजे.” गेल्या वर्षी हिरानी यांनीही सांगितलं होतं की त्यांच्या कडे एक आयडिया आहे आणि ते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत. हे सांगणं आवश्यक आहे की ‘मुन्ना भाई M.B.B.S.’ हा राजकुमार हिरानींचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर राजकुमार हिरानी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
advertisement
बॉलिवूडमध्ये हिट चित्रपटांच्या सीक्वलचा ट्रेंड
बॉलिवूडमध्ये सध्या हिट चित्रपटाच्या सीक्वलचा ट्रेंड सुरू आहे. 'गदर 2'च्या यशानंतर अनेक जु्न्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. यात बॉर्डर 2, हेरा फेरी 3, वेलकम टू द जंगल (वेलकम 3), नो एन्ट्री 2 आणि 'मुन्ना भाई 3' या चित्रपटांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मु्न्ना आणि सर्किट पुन्हा थिएटर गाजवणार! अरशद वारसीने 'मुन्ना भाई 3'बाबत दिली मोठी हिंट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement