सर थोडा वेळ थांबा ना..! नानांची दाखवलं 'क्रांतिवीर' रुप, नंतर जे झालं ते पाहून बॉलिवूड अभिनेतेही शॉक, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nana Patekar : ओ रोमियो ट्रेलर लाँचला शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी उशिरा आल्याने नाना पाटेकर कार्यक्रमातून निघून गेले. नानांचं क्रांतिवारी रूप पाहून सगळेच शॉक झाले. नानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा खट्याळ, मिश्कील स्वभाव सगळ्यांनी पाहिला आहे. पण त्याच्यातील वक्तशीरपणा आणि शिस्त फार कमी लोकांनी पाहिली आहे. नाना वेळेचे पक्के आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांची वेळ कोणी नाही पाळली तर तेही समोरच्यासाठी थांबत नाहीत. याचा प्रत्यय नुकत्याच संपूर्ण नवोदित कलाकारांनी आणि बॉलिवूडकरांना आला.
'ओ रोमियो' सिनेमाच्या ट्रेलर लाँच आधीच अभिनेते नाना पाटेकर कार्यक्रमातून निघून गेले. सगळ्यांनी नानांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण नानांच्या रागापुढे कोणाचंच चाललं नाही. नानांनी त्यांचं क्रांतिवीर रुप दाखवलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळे बॉलिवूडकर शॉक झाले.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार, नाना पाटेकर दुपारी 12 वाजता कार्यक्रमात पोहोचले. तोपर्यंत सिनेमाचे मुख्य कलाकार शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी आलेच नाहीत. ते दुपारी सुमारे दीड तास उशिरा पोहोचले. असे वृत्त आहे की दोन्ही कलाकार जवळच्या सिनेमागृहात सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात बिधी होते, ज्यामुळे मुख्य कार्यक्रम उशिरा सुरू झाला.
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, नाना पाटेकर यांनी इव्हेंटमधून निघायचं ठरवलं. ते थिएटरमधून बाहेर आले. त्यांना तिथल्या लोकांनी सर थोडा वेळ थांबा म्हणत थांबण्याची विनंती केली. पण नाना कोणाचंच ऐकलं नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की एक व्यक्ती लिफ्टपर्यंत नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतेय पण नाना त्या व्यक्तीला हातातील घडाळ्याची वेळ दाखवताना दिसत आहेत. नानांचं असं निघून जाणं उपस्थितांसाठी शॉकिंग होतं.
advertisement
advertisement
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची प्रतिक्रिया दिली. ते हसत म्हणाले, "नानाजी इथे असते तर खूप छान झाले असते, पण तो त्याच्या खास शैलीत उठला आणि म्हणाला, तुम्ही मला एक तास वाट पाहायला लावली आहे, मी आता जातो. तो त्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच तो नाना पाटेकर आहे. "
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा "ओ रोमियो" हा एक गँगस्टर ड्रामा आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी हा सिनेमा रिलीड होणार आहे. शाहिद, तृप्ती आणि नाना पाटेकर यांच्या व्यतिरिक्त, या सिनेमात विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया आणि फरीदा जलाल, राहुल देशपांडे यांसारखे दिग्गज कलाकार देखील आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सर थोडा वेळ थांबा ना..! नानांची दाखवलं 'क्रांतिवीर' रुप, नंतर जे झालं ते पाहून बॉलिवूड अभिनेतेही शॉक, VIDEO










