advertisement

नाना पाटेकरांचा OTT डेब्यू! पहिल्या वेब सीरिजमध्ये आक्रमक अंदाज, कुठे होणार रिलीज?

Last Updated:

Nana Patekar OTT Debut : राजकीय-सामाजिक थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजचा धमाकेदार प्रोमो रिलीज झाला आहे. नाना या सीरिजमधून पहिल्यांदाच ओटीटीवर डेब्यू करत आहेत.

News18
News18
अभिनेता नाना पाटेकर गेली अनेक वर्ष मराठी, हिंदीसह साऊथ सिनेमसृष्टीतही काम करत आहेत. नानांच्या अभिनयाचं कौतुक करू तितकं कमी आहे. नानांचा ओ रोमियो हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्याआधी ते रजनिकांत यांच्याबरोबर काला या साऊथ सिनेमात दिसले होते. दरम्यान इतक्या वर्षांनंतर नानांचा OTT वर डेब्यू होणार आहे. नानांच्या पहिल्या वहिल्या वेब सीरिजचा प्रोमो समोर आला आहे.
'संकल्प' असं नानांच्या पहिल्या वेब सीरिजचं नाव आहे. सस्पेन्स, थ्रिलर जॉनर असलेल्या या वेब सीरिजचा धमाकेदार प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये नाना पाटेकर एका पंडिताच्या भूमिकेत दिसत आहेत. मोठ्या आदर सत्कारानं पंडिताचं आगमन होत. प्रत्येक मोठी व्यक्ती येऊन पंडिताचा सल्ला घेताना दिसतोय आणि अचानक पंडिताचं एक आक्रमक रुप सगळ्यांना पाहायला मिळतं. अवघ्या 59 सेकंदाच्या या प्रोमोनं शेवटपर्यंत सगळ्यांना खिळवून ठेवलं आहे. प्रोमोवरून सीरिज पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
advertisement
संस्कार, सत्ता आणि समर्पण हा या सीरिजचा विषय आहे. मूल्य, अधिकार आणि भक्ति याच्याभोवती फिरणारी कथा आहे. सामाजिक आणि राजकीय थ्रिलर या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.   संकल्प या सीरिजचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या सीरिजचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ही सीरिज अमेझॉन | MX प्लेअरवर रिलीज होणार आहे. सीरिजची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही.
advertisement
सीरिजमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर संजय कपूर, कुब्रा सैत आणि मोहम्मद झिशान अयुब हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाना पाटेकर हे स्वत: सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेले अभिनेते आहेत. अभिनय क्षेत्रात काम करत असताना या दोन्ही क्षेत्राचं उत्तम ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे या वेब सीरिजमध्ये त्यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. नानांच्या पहिल्या वेब सीरिजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
नाना पाटेकरांचा OTT डेब्यू! पहिल्या वेब सीरिजमध्ये आक्रमक अंदाज, कुठे होणार रिलीज?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement