कार थांबवून चाहत्यांचा हंगामा, हजारोंच्या गर्दीत अडकली प्रभासची हिरोईन; घडलं भयंकर, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्रभासची हिरोईन हजारोंच्या गर्दीत अडकली. अभिनेत्री पाहण्यासाठी फॅन्सने कार थांबवून हंगामा केला. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
साऊथ सिनेमा आणि तिथल्या कलाकारांची क्रेझ काही वेगळीच आहे. कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात. पण कधी कधी ही गर्दी कलाकारांच्याच अंगलट येते. प्रभासच्या पुढच्या चित्रपटात दिसणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवालसोबत असाच प्रकार घडला. तिला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी इतकी गर्दी केली की त्या गर्दीतून तिला बाहेर पडणं कठिण झालं. अभिनेत्रीला कसंबसं त्या गर्दीतून बाहेर काढण्यात आलं.
निधी अग्रवाल अलीकडेच हैदराबादमध्ये तिच्या गाण्याच्या लाँचिंग एव्हेंटसाठी गेली होती. जाताना ती व्यवस्थित गेली मात्र बाहेर पडताना तिच्या नाकीनऊ आले. निधी अग्रवालला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. अभिनेत्रीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये प्रचंड बेशिस्त पाहायला मिळाली. लोकांनी तिला चारही बाजूंनी घेरलं. त्या गर्दीत तिला तिचा ड्रेसही सांभाळणंही कठीण झालं. तिच्या बाऊसर्सनी तिला कसंबसं तिच्या कारमध्ये बसवलं. कारमध्ये बसल्यानंतर निधीने सुटकेचा श्वास सोडला. हा सगळा जमाव पाहून ती शॉक झाली.
advertisement
निधी अग्रवाल 'द राजा साहेब' या सिनेमात अभिनेता प्रभासबरोबर दिसणार आहे. या सिनेमातील 'सहाना सहाना' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. या गाण्याचा लाँचिंग एव्हेंट हैद्राबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिथे तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. गर्दीतून बाहेर पडतनाचा निधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांना तिला यासाठी ट्रोलही केलं आहे. एका युजरने लिहिले, "'दराजासाब'च्या गाण्याच्या लाँचवेळी निधीला असे पाहून माझा श्वासच गेला." दुसऱ्याने लिहिले, "हे फॅन्डम नाही..."
advertisement
इतक्या गर्दीत तिच्यासोबत काहीही घडू शकलं असतं पण याप्रसंगी कोणीही माणुसकी दाखवली नाही. गर्दीत तिचे कपडे सांभाळत ती कशीबाशी कारपर्यंत पोहोचली, असं म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे.
#WATCH : Men worse than hyenas, Nidhhi Agerwal gets mobbed and manhandled by fans at 'The Raja Saab' song launch event
The Raja Saab song launch event was held at Lulu Mall in Hyderabad on Wednesday evening and was attended by director Maruthi and Nidhhi Agerwal.#NidhhiAgerwal… pic.twitter.com/R0ymbKQ6s1
— upuknews (@upuknews1) December 18, 2025
advertisement
अभिनेत्री निधी अग्रवालने 2017 साली टायगर श्रॉफसोबत 'मुन्ना मायकल' या सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर ती 'साव्यासाची', 'मिस्टर मजनू' आणि 'हरी हरा वीरा मल्लू' सारख्या सिनेमांमध्ये दिसली. ती लवकरच हॉरर कॉमेडी 'द राजा साब' मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 9 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कार थांबवून चाहत्यांचा हंगामा, हजारोंच्या गर्दीत अडकली प्रभासची हिरोईन; घडलं भयंकर, VIDEO










