'मला ट्रॉमा आहे, मी लग्न...', रणवीर अल्लाहबादियाने कन्फर्म केलं रिलेशनशिप, इथे EX GF ने लीक केले प्रायव्हेट चॅट

Last Updated:

Ranveer Allahbadia Controversy : रणवीर अल्लाहबादिया आणि जूही भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स गर्लफ्रेंड निक्की शर्माने एक धक्कादायक स्क्रीनशॉट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

News18
News18
मुंबई : लोकप्रिय यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ 'बीअरबाइसेप्स' याची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याने नुकतंच अभिनेत्री जूही भट्टसोबत नवीन रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली, पण त्याच्या या घोषणेनंतर काही तासांतच त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री निक्की शर्माने एक धक्कादायक स्क्रीनशॉट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

निक्की शर्माने फोडले गुपित

रणवीरने दिवाळीच्या दिवशी जूही भट्टसोबतचे रिलेशनशिप अप्रत्यक्षपणे कन्फर्म केल्यानंतर, निक्की शर्माने लगेच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका मित्रासोबत झालेल्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये निक्कीने कोणाचेही नाव न घेता आपल्या माजी प्रियकरावर निशाणा साधला आहे.
निक्कीने लिहिले आहे की, "तो (रणवीर) काही महिने खूप छान वागेल, पण नंतर ट्रॉमामुळे मी कधीच लग्न करू शकत नाही किंवा बाळ जन्माला घालू शकत नाही, असं म्हणेल."
advertisement
चॅटमध्ये पुढे लिहिले होते, "मी आतून हादरले होते, पण नेहमी वरून ठीक असल्याचा देखावा करत राहिले. तो काही महिने चांगला राहील आणि मग म्हणेल, 'ओह हो, मला ट्रॉमा आहे, मी कधीच लग्न करू शकणार नाही किंवा बाळं जन्माला घालू शकणार नाही.'" निक्कीचे हे चॅट थेट रणवीरसोबतच्या नात्यावर शंका उपस्थित करत आहे.
advertisement
advertisement

दिवाळीच्या फोटोंनी जुही-रणवीरच्या नात्यावर शिक्कामोर्तब

रणवीरने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना, 'यावर्षी मोठ्या माणसासारखी दिवाळी साजरी करतोय' आणि 'दैवी कृपेबद्दल धन्यवाद' असे कॅप्शन दिले होते. यानंतर जुही भट्टनेही त्याच फुलांच्या रांगोळीचा फोटो शेअर केला, ज्यामुळे ते दोघे एकत्र होते हे स्पष्ट झाले.
रणवीरचे यापूर्वी निक्की शर्मासोबत रिलेशनशिप होते. तो तिच्या चेहऱ्यावर 'सूर्यफूल' इमोजी लावून फोटो शेअर करायचा. त्याने निक्कीला अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.
advertisement
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर एका पॉडकास्ट शोमध्ये पालकांशी संबंधित आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे वादात सापडला होता. या प्रकरणी त्याच्यावर एफआयआर देखील दाखल झाली होती, ज्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला ट्रॉमा आहे, मी लग्न...', रणवीर अल्लाहबादियाने कन्फर्म केलं रिलेशनशिप, इथे EX GF ने लीक केले प्रायव्हेट चॅट
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement