VIDEO : 'बाबा मला...' लेकीनं दिला नितीन देसाईंच्या पार्थिवाला खांदा; सेलिब्रिटींसह उपस्थितांचे डोळे पाणावले

Last Updated:

नितीन देसाईंना त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे एन. डी. स्टुडिओतच अखेरचा निरोप देण्यात आला असून जोधा अकबरच्या सेटवर त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तत्पूर्वी त्यांच्या अंत्यसंस्काराचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

नितीन देसाई
नितीन देसाई
मुंबई, 04 ऑगस्ट :  प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं सगळीकडेच खळबळ उडाली. २ ऑगस्ट रोजी सकाळी कर्जत येथील एनडी.डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली आहे. त्यानंतर आज ४ ऑगस्ट रोजी नितीन यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. नितीन देसाईंना त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे एन. डी. स्टुडिओतच अखेरचा निरोप देण्यात आला असून जोधा अकबरच्या सेटवर त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तत्पूर्वी त्यांच्या अंत्यसंस्काराचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
आज सकाळपासून एन. डी. स्टुडिओत नितीन देसाई यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज एनडी स्टुडिओत काम करणारा प्रत्येक जण आपल्या मालकाला अखेरचा निरोप देण्यासाठी आला आहे. या अत्यंत भावुक क्षणी प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. आज संध्याकाळी नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नितीन देसाई यांच्या दोन्ही मुली, मुलगा पत्नी, आई साऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. आता त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान नितीन देसाईंच्या लेकीचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
Nitin Desai Funeral : अलविदा एनडी! कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन; शेवटच्या इच्छेनुसार कर्मभूमीत अंत्यसंस्कार
नितीन देसाई यांच्यावर काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या लेकीनं त्यांना शेवटच्या क्षणी सुद्धा साथ दिली. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलीनं नितीन त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचं दिसतंय. त्यांची मुलगी आपल्या लाडक्या बाबांना निरोप देताना अत्यंत भावुक झालेली दिसतेय. हा क्षण पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत. त्यांना शेवटच पाहताना सगळ्यांचा भावनांचा बांध फुटला आहे.
advertisement
नितीन देसाईंना शेवटच्या निरोप देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींसोबत मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. नितीन देसाईंच्या अंत्यसंस्कारासाठी एन. डी. स्टुडिओत अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेता सुबोध भावे, अभिजित केळकर आणि निखिल साने उपस्थित होते.
advertisement
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी कोकणातील दापोली या ठिकाणी झाला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. परिंदा, डॉन, माचिस, देवदास, लगान सारखे अनेक भव्यदिव्य सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. आता नितीन देसाईंच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीतील एका पर्वाचा अंत झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : 'बाबा मला...' लेकीनं दिला नितीन देसाईंच्या पार्थिवाला खांदा; सेलिब्रिटींसह उपस्थितांचे डोळे पाणावले
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement