Nitin Desai Funeral : अलविदा एनडी! कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन; शेवटच्या इच्छेनुसार कर्मभूमीत अंत्यसंस्कार

Last Updated:

नितीन देसाई यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्यावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मराठी, बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये आपल्या कामानं ओळख मिळवणारा सच्चा कलाकार अखेर अनंतात विलीन झाला.

नितीन देसाई
नितीन देसाई
मुंबई, 04 ऑगस्ट : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या 2 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. नितीन देसाई यांच्या पार्थिवार आज कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महाराष्ट्र पोलिसांकडून नितीन देसाई यांना आदरांजली आणि मानवंदना देण्यात आली. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्यांनी स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्याआधी त्यांनी माझे अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओत केले जावेत अशी शेवटची इच्छा एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली होती. त्यानुसार नितीन देसाईंवर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत. नितीन देसाई यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी, आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण देसाई कुटुंब आणि नातेवाईंकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या जाण्यानं भारतीय सिनेसृष्टीत कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेता आमिर खान, सुबोध भावे, मानसी नाईक, कोरिओग्राफर सुभाष नकाशे, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक कलाकार नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीत होते. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सर्वेसर्वा सुधीर साळवी देखील या ठिकाणी उपस्थित होते.
नितीन देसाई यांचा मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर एनडी स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. जोधा अकबरच्या सेटवर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकार तसेच राजकीय मंडळींनी या ठिकाणी येत नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं. नितीन देसाई यांना शेवटचं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. अत्यंत जण अंत:करणानी नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात आला. एनडी स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी साश्रू नयनांनी आपल्या मालकाला अखेरचा निरोप दिला.
advertisement
नितीन दादांचं जाणं म्हणजे आमचं सगळं काही संपणं, अशी भावना एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाईंबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई हे नाव मोठं झालं. त्याच कर्मभूमीत आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नितीन देसाई यांच्या निधनानं संपूर्ण एनडी स्टुडिओ शांत झाला.
advertisement
‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘परिंदा’, ‘डॉन’,  सारख्या भव्य सिनेमांचे सेट नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारले होते. इतकंच नाही तर अनेक सिनेमे त्यांनी केलेत.  कलाकार सिनेमाचं शुटींग संपवून पॅक अप झाल्यानंतरही सेटवर थांबून राहायचे. नितीन देसाई यांनी साकारलेल्या भव्य सेटवरून कलाकारांचा पाय निघत नसे. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेले नितीन देसाई यांनी ना केवळ मराठी तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील आपलं नाव कमावलं होतं. अनेक नव्या कलाकृती ते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळून गेली आहे.
advertisement
2003 साली तयार करण्यात आलेल्या या एनडी स्टुडिओला नुकतील 20 वर्ष पूर्ण झालीत. एकेकाळी नितीन देसाई या स्टुडिओमध्ये एकाच वेळी 28 प्रोजेक्टवर काम करायचे. आजवर त्यांनी 198 हून अधिक सिनेमे 200 हून अधिक टेलिव्हिजन मालिका आणि 350 हून अधिक गेम शोसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Desai Funeral : अलविदा एनडी! कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन; शेवटच्या इच्छेनुसार कर्मभूमीत अंत्यसंस्कार
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement