भारतासोबत वाकडं, पण बॉलीवूड गाण्याची वेडी पाकिस्तानी क्रिकेटपटू, रिल्स पाहून तुमचे होश उडतील

Last Updated:

पाकिस्तानी क्रिकेटर सिद्रा अमीनने रिल्स पाहून अनेकांचा विश्वासच बसत नाही की हीच ती भारताविरुद्ध शतक झळकवणारी पाकिस्तानी खेळाडू आहे.

News18
News18
मुंबई : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये पाकिस्तानच्या सिद्रा अमीनने भारताविरुद्ध इतिहास रचला आहे. सहाव्या सामन्यात सिद्राने केवळ उत्कृष्ट फलंदाजीच केली नाही, तर एका नव्या विक्रमाची नोंदही केली. भारताविरुद्ध मैदानावर सामना करणारी ही पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू क्रिकेटसाठी जरी भारताची कट्टर प्रतिस्पर्धी असली तरी भारतावर तिचं प्रेम आहे. भारतातील बॉलिवूड गाण्यांवर तिचं विशेष प्रेम आहे.
सिद्रा अमीन सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. ती रीलच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती बॉलिवूड गाण्यांची फॅन असून तिने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स तयार केलेत. तिच्या त्या व्हिडिओंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारताविरुद्ध लढणारी सिद्रा, मैदानाबाहेर मात्र भारतीय संगीताच्या तालावर थिरकताना दिसते आणि तिचे रिल्स पाहून अनेकांचा विश्वासच बसत नाही की हीच ती भारताविरुद्ध शतक झळकवणारी पाकिस्तानी खेळाडू आहे.
advertisement
भारतीय  बॉलरचा सामना करताना सिद्राने जबरदस्त आत्मविश्वास दाखवला. तिने 106 बॉल्समध्ये 81 रन केले. त्यात 9 फोर आणि 1 सिक्सर मारला.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Sidra Amin (@sidraamin31)



advertisement












View this post on Instagram























A post shared by Sidra Amin (@sidraamin31)



advertisement












View this post on Instagram























A post shared by Sidra Amin (@sidraamin31)



advertisement
सिद्रा अमीन ही भारताविरुद्ध सिक्सर मारणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटर ठरली आहे. याआधी हा विक्रम निदा दारच्या नावावर होता. तिने जिने 2013 मध्ये 68 धावा केल्या होत्या. त्याच वर्षी नैन आबिदीनेही भारताविरुद्ध 60 धावा केल्या होत्या.












View this post on Instagram























A post shared by Sidra Amin (@sidraamin31)



advertisement
टॉस जिंकून पाकिस्तानने पहिली बॉलिंग निवडली.  भारताने सर्व विकेट्स गमावून 247 रन्स काढले. भारताकडून हरलीन देओल (46), जेमिमा रॉड्रिग्ज (32), रिचा घोष (35 नाबाद) यांनी रन्स केले. गोलंदाजीतून पाकिस्तानच्या डायना बेगने चार विकेट्स घेतल्या, तर सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारतासोबत वाकडं, पण बॉलीवूड गाण्याची वेडी पाकिस्तानी क्रिकेटपटू, रिल्स पाहून तुमचे होश उडतील
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement