Prajakta Mali : का केली 12 ज्योर्तिलिंगाची यात्रा? प्राजक्ता माळीने सांगितलं खरं कारण, लोकांना सावधही केलं

Last Updated:

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केलेली 12 ज्योर्तिलिंग यात्रा चांगलीच चर्चेत आली. तिनं ही यात्रा का केली यामागचं कारण सांगितलं.

News18
News18
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतीच तिची बारा ज्योर्तिलिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिनं भीमाशंकराचं दर्शन घेऊन तिनं बारा ज्योर्तिलिंग यात्रा पूर्ण केली. प्राजक्तानं मध्येच ज्योर्तिलिंगाची यात्रा का केली असा प्रश्न अनेकांना पडला होता. प्राजक्तानं स्वत: व्हिडीओ शेअर करत यामागचं कारण सांगितलं.
प्राजक्ता म्हणाली, "मी लहानपणापासून भरतनाट्यम शिकतेय. त्यात ती देवांवर आधारित इतक्या रचना नाचतेय. त्यातील 75 टक्के रचना या भगवान शिवावर आधारित होत्या. नाचाची देवता नटराज आहे म्हणजेच शिवा. मला जे अध्यात्किम गुरू मिळाले त्यांचं नावही रवीशंकर आहे. अशा अनेक गोष्टींमुळे ते डोक्यात होते. त्यामुळे मलाही माहिती नव्हतं की हे करायचं आहे. देवाने माझ्याकडून ही गोष्ट घडवून घेतली आहे असं मला वाटतं."
advertisement

सगळ्यात आवडतं ज्योर्तिलिंग? 

प्राजक्तानं सांगितलं, "सगळ्याच ज्योर्तिलिंगाना तितकंच महत्त्वं आहे. ती सगळी शक्तीस्थळं आहेत. खूप पावफुल आहे. एखादं आपलं फेव्हरेट असतं. माझं फेव्हरेट आहे उज्जैन महाकाल. बारा ज्योर्तिलिंग आहेत तशा बारा राशी देखील आहेत. माझ्या राशीनुसार, माझं ज्योर्तिलिंग महाकाल आहे."
advertisement

सर्वात अवघड ज्योर्तिलिंग कोणतं होतं?

प्राजक्ता म्हणाली, "केदारनाथ. कारण तिथलं वातावरण. तिथे जाण्याच्या व्यवस्था. हेलिकॉप्टर्स आहेत पण खूप बेभरवशाचे आहेत. सेफही आहेत पण दुरून कुठून तरी आहेत पण ते फार महाग आहे. तुम्हाला पायी ट्रेक करावा लागतो, खेचर घ्यावा लागतो किंवा पालखी घ्यावी लागते. तरीही तुम्हाला आत्यंतिक त्रास होतोच. सुसह्य यात्रा नाहीये. वर्षातले काही काळ ती यात्रा चालू असते. अनंत अडचणी असतात."
advertisement
advertisement

कोणत्या ज्योर्तिलिंगाला नक्की भेट द्यावी?

प्राजक्तानं सांगितलं, "महाराष्ट्रातील सगळी ज्योर्तिलिंग तुम्ही कराच. मला त्र्यंबकेश्वर प्रचंड आवडतं. श्री शैलम आंध्रप्रदेश हे मस्ट विझीट करण्यारखं ज्योर्तिलिंग असल्याचं प्राजक्तानं सांगितलं. खाद्ययात्रेत काय आवडलं हे सांगत प्राजक्ता म्हणाली, केदारनाथला शिकंजी मला खूप आवडली. मध्यप्रदेश सगळीकडे जिलेबी फार भारी मिळते. बद्रिनाथला मल्लयो नावाचा दुधाचा प्रकार फार भारी मिळतो."
advertisement

सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायला हवं?

"प्रत्येक ठिकाणी एक दिवस राहण्याचा प्रयत्न करा. गुरूजींपासून, पंडितांपासून, बाजारीकरणापासून तुम्हाला स्वत:ला जपावं लागेल त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. अवांतर खर्च करू नका जे सध्या होतंय आणि त्याचं काही करी करायला हवं असं मला वाटतंय", असं प्राजक्तानं सांगितलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali : का केली 12 ज्योर्तिलिंगाची यात्रा? प्राजक्ता माळीने सांगितलं खरं कारण, लोकांना सावधही केलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement