10 दिवसांच्या मुलीला थिएटरमध्ये सोडून गेले आई-वडील, उंदरांनी शरीर कुरतडले; आज गाजवतेय इंडस्ट्री
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood : आज ज्या स्टारकिडचे नाव बॉलिवूडमध्ये मोठ्या सन्मानाने घेतले जाते, तिला एका दिग्दर्शकाने त्या वेळी दत्तक घेतले होते, जेव्हा तिचे आई-वडील तिला थिएटरमधील सीटखाली सोडून गेले होते. उंदरांनी तिचे संपूर्ण शरीर कुरतडले होते आणि त्या क्षणीच हा दिग्गज दिग्दर्शक तिच्या आयुष्यात देवदूतासारखा आला आणि तिचे नशीब बदलले.
Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. सुष्मिता सेन, सनी लिओनी आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सची नावे या यादीत आहेत. यातील एक नाव म्हणजे प्रकाश झा. आश्रम, राजनीति, गंगाजल, सत्याग्रह आणि आरक्षण यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध असलेल्या प्रकाश झा यांचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिले आहे. विशेषत: अभिनेत्री दीप्ती नवल यांच्यासोबतचे लग्न आणि नंतर झालेला घटस्फोट खूप चर्चेत होता. पण त्यांच्या आयुष्यातील एक भाग असा आहे, जो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी स्वत:ला एक मूल दत्तक घेण्याचं वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी पूर्णदेखील केलं.
एक फोन आणि बदलले प्रकाश झा यांचे आयुष्य
दररोज कुठेतरी एखादे बाळ कचरापेटीत किंवा ओसाड जागेत टाकल्याच्या बातम्या समोर येतात. अशीच एक हृदयद्रावक घटना प्रकाश झा यांच्यासमोर आली आणि त्यांच्या आयुष्य पूर्णपणे बदललं. 2015 मध्ये ‘पॅरेंट सर्कल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 1988 मधील एका घटनेचा उल्लेख केला होता. प्रकाश झा हे दिल्लीतील एका अनाथालयात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. त्याचदरम्यान अनाथालयातून एक फोन आला की 10 दिवसांची एक मुलगी थिएटरच्या सीटखाली सोडून गेली आहे. प्रकाश झा यांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून गेले. कारण उंदरांनी त्या बाळाचे शरीर कुरतडले होते.
advertisement
advertisement
उंदीर आणि कीटकांनी केलेल्या जखमांमुळे चिमुकल्या मुलीच्या शरीरात गंभीर संसर्ग पसरला होता. प्रकाश झा यांनी सर्वप्रथम तिच्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी तिला दत्तक घेतले. त्यांच्या पत्नी दीप्ती नवल यांनीही यात त्यांना पूर्ण साथ दिली. दोघांनी मिळून त्या बाळाला दत्तक घेतले आणि तिचे नाव ठेवले दिशा झा. दिशा झा ने आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
घटस्फोटानंतरही नातं तुटलं नाही
प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांनी दिशाला दत्तक घेतलं तेव्हा त्यांना स्वतःची मुले नव्हती. काही काळानंतर दीप्ती गर्भवती झाल्या, पण त्यांचा गर्भपात झाला. हा दोघांसाठी प्रचंड धक्का होता. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला आणि अखेर ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर दिशाची कस्टडी प्रकाश झा यांनी घेतली आणि त्यांनीच तिला वाढवले. दुसरीकडे दीप्ती नवल यांचेही दिशासोबत चांगले संबंध आहेत आणि त्या आजही तिच्यासोबत वेळ घालवताना दिसतात.
advertisement
दिशा आज एक प्रसिद्ध निर्माती आहे. 2019 मध्ये तिने वडिलांसोबत 'फ्रॉड सइय्यां' या चित्रपटाची निर्मिती केली होती. तिची स्वत:ची 'पेन पेपर सीजर एंटरटेनमेंट' नावाची एक निर्मिती संस्था आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
10 दिवसांच्या मुलीला थिएटरमध्ये सोडून गेले आई-वडील, उंदरांनी शरीर कुरतडले; आज गाजवतेय इंडस्ट्री


