(विजय वंजारा, प्रतिनिधी) मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. बोरिवली पश्चिम येथील गणपत पाटील नगर, स्ट्रीट नंबर ७ आणि ८ दरम्यान असलेल्या भंगार दुकानात भीषण आग लागली. भंगार दुकान जळून खाक झालं आहे. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण कळू शकलेले नाही. या आगीमुळे आठ ते दहा दुकानं जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम करत आहेत.
Last Updated: November 22, 2025, 18:13 IST