Pranit More : लोकांना ट्रोल करणारा प्रणित मोरे Bigg Boss 19च्या घरात ढसाढसा रडला, कारण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pranit More Crying Bigg Boss 19 : प्रणितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं काय झालं ज्यामुळे प्रणितला बिग बॉसच्या घरात ओक्शाबोक्शी रडू आलं.
मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरे सध्या बिग बॉस 19च्या घरात आहे. बिग बॉस 19मध्ये असणारा तो एकमेवर मराठी माणूस आहे. या शोमध्ये गेल्यापासून प्रणित चर्चेत आहे. प्रणित घरात चांगला खेळ खेळताना दिसतोय. अनेक हिंदी सेलिब्रेटींसमोर प्रणित पुरून उरतोय. प्रणितची उत्तर देण्याची स्टाइल सगळ्यांना आवडतेय. स्टँड अप कॉमेडी करत असताना प्रणित मोरेनं अनेकांना ट्रोल केलं आहे.त्याने अगदी सलमान खानलाही सोडलं नाही. पण बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सगळंच बदललं आहे. बाहेर लोकांचा ट्रोल करणारा प्रणित मोरे बिग बॉस 19च्या घरात ढसाढसा रडताना दिसला. प्रणितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं काय झालं ज्यामुळे प्रणितला बिग बॉसच्या घरात ओक्शाबोक्शी रडू आलं.
बिग बॉस 19 च्या चौथ्या आठवड्यात घरात चांगलीच भांडणं झाली. एकटा प्रणित मोरे अमाल मलिक आणि बसीर अली यांना सामोरं जात होता. बसीर अलीने प्रणित मोरेला नको नको त्या शब्दांत ट्रोल केलं. दोघांनी प्रणितला त्याच्या रंगावरून, कामावरून हिणवलं. तु तुझ्या गावाला निघून जा म्हणत त्याला वाईट शब्दांत ट्रोल केलं. या सगळ्यांची चर्चा विकेंड का वारला झाली. सलमान खानने सगळ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
advertisement
बिग बॉस 17ची विजेती गौहर खान विकेंड का वारला आली होती. तिने प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यातील भांडणाचा मुद्दा काढला. तिने बसीरला चांगलंच सुनावलं. गौहरला सलमान खानने देखील पाठिंबा दाखवला. गौहर म्हणाली, बसीर प्रणितला तुमच्या गावी परत जा असं म्हणाला. आपला देश आपल्या गावांमुळेच आहे. इथे गाव आहे म्हणून आपल्याकडे वीज, अन्न आणि बरंच काही आहे. त्यामुळे आपल्याला गावाकडून आल्याचा अभिमान वाटला पाहिजे.
advertisement
advertisement
गौहरच्या बोलण्याचं समर्थन करत सलमान खानने बसीरची चांगलीच शाळा घेतली. सलमान म्हणाला, बसीर हे काय आहे, कोणाच्या रंगावर जाणं, लुक्सवर जाणं... आणि हे काय आहे गावी परत जा. प्रणित कोणत्या गावावरून आलाय. पुणे गाव आहे... त्यावर बसीर म्हणतो, सर मला माहितीही नाही तो कुठून आलाय. त्यावर सलमान त्याला झापतो. म्हणतो, मग तू असं कसं बोलू शकतो. अशी विधानं तुलाच गोत्यात आणू शकतात. मी पण गावावरून आलोय यार, आम्ही पण खेती वाडीतून आलोय. माणूस काम करण्यासाठी गावातून शहरात येतो. काम करतो, मेहनत करतो आणि मग फार्महाऊस खरेदी करतो. सलमान खानचं हे बोलणं एकूण प्रणितला अश्रू अनावर होतात. प्रणित ढसाढसा रडायला लागतो. प्रणितला रडताना पाहून सगळे त्याला धीर देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pranit More : लोकांना ट्रोल करणारा प्रणित मोरे Bigg Boss 19च्या घरात ढसाढसा रडला, कारण काय?