Priya Bapat-Umesh Kamat: मावळता सूर्य आणि धीर सुटला, उमेशला किस करताना प्रिया बापट कॅमेऱ्यात कैद
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya Bapat Umesh Kamat kissing photo: मराठी सिनेसृष्टीतील पॉवर कपल म्हणून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामतला ओळखलं जातं. ही जोडी सतत चर्चेत असते. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावरही भरपूर सक्रिय असतात.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील पॉवर कपल म्हणून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामतला ओळखलं जातं. ही जोडी सतत चर्चेत असते. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावरही भरपूर सक्रिय असतात. एकमेकांवरील प्रेम ते सतत दाखवताना दिसतात. अशातच या क्युट कपलने एक नवा फोटो शेअर केलाय. त्यांचा हा रोमॅंन्टिक फोटो इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे.
प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्रामवर उमेशसोबतचा खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघेही किस करताना दिसत आह. प्रिया आणि उमेशचा किस करतानाचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. हर्ट इमोशी टाकत प्रियाने ही पोस्ट शेअर केलीय. अगदी काही वेळात पोस्ट व्हायरल झाली आणि कमेंट, लाइक्स पाऊस पहायला मिळत आहे.
advertisement
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रिया आई होण्याबाबत बोलली बोलली होती. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली आहेत. मात्र तरीही त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला नाही. यावर दोघांनाही सतत प्रश्न विचारला जातो. मात्र अखेर सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर प्रियाने मौन सोडलं.
advertisement
नुकतंच अमुक-तमुकला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, "मला या सततच्या बाळ होण्याच्या प्रश्नावर आता थकायला झालंय. माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत आणि मला मूल नाहीये. ‘मूल जन्माला घालण्यासाठी नव्हे तर मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचंय म्हणून मी लग्न करतोय’, असं मला उमेश म्हणाला होता. उद्या मला 42 व्या वर्षी वाटलं की आता मूल जन्माला घालायचं आहे तर मी घालेन. जर मला नाही वाटलं तर मी तेव्हाही नाही घालणार. मला वाटतं आपण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 08, 2024 1:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Bapat-Umesh Kamat: मावळता सूर्य आणि धीर सुटला, उमेशला किस करताना प्रिया बापट कॅमेऱ्यात कैद








