Radhika Bhide New Song : 'मन धावतंय' नंतर रातोरात बदललं राधिका भिडेचं आयुष्य, मिळाला सिनेमा, 'हो आई' म्हणत लावणार वेड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'मन धावतंय' या गाण्यानंतर गायिका राधिका भिडे एका रात्रीत स्टार झाली. या गाण्यानंतर राधिकाचं आयुष्य बदललं. तिला सिनेमा मिळाला असून तिचं पार्श्वगायिका म्हणून पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
सध्या सोशल मीडिया मन धावतंय हे गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. कोकणातील राधिका भिडेनं तिच्या आवाजानं संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये मन धावतंय हे गाणं टॉपवर आहे. तरूणाईचा लाडका लाडका मराठमोळा आवाज ठरलेल्या राधिका भिडेचं आयुष्य या गाण्यामुळे एका रात्रीत बदललं. राधिका भिडेचं पहिलं मराठी चित्रपट गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. राधिका पार्श्वगायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
उत्तर या मराठी सिनेमात राधिका भिडेचं सुंदर गाणं ऐकायला मिळणार आहे. 'हो आई' असं गाण्याचं नाव असून राधिकाचं पार्श्वगायिका म्हणून पहिलं गाणं ठरलं आहे. उत्तर या मराठी सिनेमाच्या प्रमोशनल गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि 'तू आहेस म्हणून मी आहे' ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे.
advertisement
अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं हे गाणं आहे. यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन ह्या जोडीने 'मन धागा धागा जोडते नवा', 'माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं' आणि 'तुला जपणार आहे' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील गाणं आहे.
advertisement
'उत्तर' या सिनेमातून अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे. रेणुका शहाणे यांच्याबरोबर अभिनेता अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या 12 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
राधिका भिडे ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. राधिकाची बहिण शमिका भिडे ही देखील प्रसिद्ध गायिका आहे. राधिका आयपॉपस्टार या ओटीटीवर लोकप्रिय शोमधून प्रसिद्धी मिळवली. राधिका ही अनेक तरुणांची क्रश झाली आहे. मन धावतंय या गाण्यानंतर तिची फॅन फॉलोविंग देखील प्रचंड वाढली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Radhika Bhide New Song : 'मन धावतंय' नंतर रातोरात बदललं राधिका भिडेचं आयुष्य, मिळाला सिनेमा, 'हो आई' म्हणत लावणार वेड


