Samantha Prabhu Wedding: 'डेस्परेट लोक...', इथे समांथा-राजचं लग्न, तिथे पहिल्या पत्नीची क्रिप्टिक पोस्ट! कोणावर साधला निशाणा?

Last Updated:

Samantha Prabhu-Raj Nidimoru Wedding: राज निदिमोरु यांच्या माजी पत्नी श्यामाली दे यांनी इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट टाकली होती, ज्यामुळे आता समंथा आणि राज यांच्या लग्नाच्या बातमीपेक्षा श्यामालीच्या पोस्टचीच जास्त चर्चा होत आहे.

News18
News18
मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रूथ प्रभू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरु यांनी ईशा योगा सेंटरमध्ये गुपचूप विवाह उरकला असून त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, या दरम्यान, राज निदिमोरु यांच्या माजी पत्नी श्यामाली दे यांनी इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट टाकली होती, ज्यामुळे आता या लग्नाच्या बातमीपेक्षा श्यामालीच्या पोस्टचीच जास्त चर्चा होत आहे.
रविवारी रात्री उशिरा श्यामाली दे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक छोटा, पण अत्यंत कठोर संदेश पोस्ट केला. श्यामाली यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "Desperate people do desperate things." (हताश लोकं अविचारी गोष्टी करतात.)
advertisement
श्यामालीने हा संदेश नेमका त्याच वेळी पोस्ट केला, ज्यावेळी समंथा आणि राज यांच्या कथित लग्नाच्या बातम्या Reddit आणि अन्य प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत होत्या. यामुळे सोशल मीडिया यूजर्सनी लगेचच या पोस्टचा संबंध सामंथा-राज यांच्या विवाहाशी जोडला.

चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

श्यामालीच्या या पोस्टमुळे ऑनलाइन चर्चा आणखी वाढल्या होत्या. एका यूजरने लिहिले, "याचा अर्थ ते दोघे निराशेपोटी (Desperation) लग्न करत आहेत? खूप भयानक विचार आहे. पण लोकं वेड्यासारखं वागतात हे खरंय." दुसऱ्या एका व्यक्तीने श्यामालीबद्दल सहानुभूती व्यक्त केली, "मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. जो माणूस तुम्ही काहीच नव्हता तेव्हा तुमच्यासोबत होता, तोच माणूस तुमच्यावर खरं प्रेम करतो."
advertisement
काही युजर्सनी मात्र श्यामालीला या चर्चांपासून दूर राहून आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. एका यूजरने लिहिले, "त्यांच्या एक्स पत्नीने आता या जोडप्याचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्यात पुढे जायला हवे. त्यांनी त्या माणसाला आणि त्याने केलेल्या गोष्टींना विसरून आनंद शोधावा."
advertisement

कोण आहेत श्यामाली दे?

राज निदिमोरु यांच्या पहिल्या पत्नी श्यामाली दे या सहाय्यक दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा, विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. राज आणि श्यामाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला आणि २०२२ मध्ये घटस्फोट झाला. तर समंथाचेही यापूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न झाले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Samantha Prabhu Wedding: 'डेस्परेट लोक...', इथे समांथा-राजचं लग्न, तिथे पहिल्या पत्नीची क्रिप्टिक पोस्ट! कोणावर साधला निशाणा?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement