Guess Who : राजेश खन्नाला केलं डेट, पण ब्रेकअपनंतर बिझनेसमनशी थाटला संसार, आता जगतेय असं आयुष्य, कोण आहे ही?

Last Updated:

Rajesh Khanna सोबत सात वर्षे रिलेशनमध्ये असणारी एक अभिनेत्री आज आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. कामापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अभिनेत्री चर्चेत आहे.

News18
News18
Rajesh Khanna : दिग्गज अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझायनर अंजू महेंद्रू आज आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 जानेवारी 1946 रोजी मुंबईत जन्मलेल्या अंजू यांनी 1966 मध्ये 'उसकी कहाणी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं, मात्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांचं वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत राहिलं. अभिनेत्री अंजू महेंद्रू आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांचं अफेअर सर्वाधिक गाजलेलं होतं. ते जवळपास 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर वेगळे झाले.
राजेश खन्ना–अंजू महेंद्रू यांचा ब्रेकअप का झाला?
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांची प्रेमकहाणी 1960 च्या दशकाच्या अखेरीस 'बंधन' (1969) या चित्रपटापासून सुरू झाली, जेव्हा ते पहिल्यांदा एकत्र ऑनस्क्रीन दिसले. जसजसं राजेश खन्नांचं सुपरस्टारडम वाढत गेलं, तसतसं त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. अंजू, ज्या कधी ग्रेस आणि एलिगन्सचं प्रतीक मानल्या जात होत्या, त्यांना हळूहळू साइडलाईन केलं जात असल्याची भावना येऊ लागली. सुपरस्टारच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेपुढे त्यांचं करिअर फिकं पडलं. राजेश खन्नांच्या पझेसिव्ह स्वभावाबद्दल आणि पारंपरिक विचारसरणीबद्दल अफवा पसरल्या. अशीही चर्चा होती की त्यांना अंजूचे मॉडर्न कपडे आणि अभिनय आवडत नव्हते. अखेर त्यांचं नातं तुटलं आणि 1973 मध्ये राजेश खन्नांनी 15 वर्षांच्या नवख्या अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केलं.
advertisement
ब्रेकअपनंतर अभिनेत्रीची अवस्था
राजेश खन्नांपासून वेगळं झाल्यानंतर अंजू लाइमलाइटपासून दूर गेल्या आणि या वादाचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. अनेक वर्षांनंतर त्यांनी आपल्या नात्याबद्दल विचार करताना कबूल केलं की आपल्या नासमजुतीमुळे त्यांनी राजेश खन्नांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला आणि नंतर त्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. त्यानंतर त्या 1972 ते 1979 दरम्यान इम्तियाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. सध्या त्या एकट्याच आयुष्य जगत आहेत.
advertisement
रुपेरी पडद्यासह TV विश्व गाजवणारी अभिनेत्री
अंजू महेंद्रू यांनी चित्रपटांसोबतच टेलिव्हिजन क्षेत्रातही काम केलं आहे. ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. आजही त्या टेलिव्हिजन आणि वेब सीरिजच्या दुनियेत सक्रिय आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : राजेश खन्नाला केलं डेट, पण ब्रेकअपनंतर बिझनेसमनशी थाटला संसार, आता जगतेय असं आयुष्य, कोण आहे ही?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement