Rajinikanth : नाद करा पण थलायवाचा कुठं! हात जोडून नमस्कार, फ्लाइंग किस; रजनीकांतने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rajinikanth Diwali 2025 : रजनीकांतच्या घराबाहेर चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या सुपरस्टारला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. थलायलानेही अत्यंत प्रेमाने या शुभेच्छांचा स्वीकार केला.
Rajinikanth Diwali Celebration with Fans : सुपरस्टार रजनीकांतने दिवाळीचा पहिला दिवस आपल्या लाडक्या चाहत्यांसोबत साजरा केला. रजनीकांतला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चेन्नईतील पोएस गार्डनर येथील घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी रजनीकांतने चाहत्यांचा प्रेमाचा त्यांच्या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार केला. रजनीकांत घराबाहेर आले आणि त्यांनी फ्लाइंग किस देत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच चाहत्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही स्वीकार केला. सोशल मीडियावर रजनीकांतचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रजनीकांतची एक झलक पाहण्यासाठी वेडे झालेल्या चाहत्यांचा आनंद या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळी रजनीकांत आपल्या पारंपारिक पोशाखात दिसून आले. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लुंगी असा त्यांचा लूक होता. यावेळी त्यांनी हात जोडून चाहत्यांना केलेला नमस्कार आणि फ्लाइंग किसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
रजनीकांतला पाहताच त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी 'हॅपी दिवाली थलायवा' असा जल्लोष केला होता. रजनीकांतनेही चाहत्यांसोबत प्रेम व्यक्त करत हात हालवला. मीडियाशी संवाद साधताना आपल्या जगभरातील चाहत्यांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या आवडत्या स्टारसाठी जोरदार जल्लोष करताना चाहते दिसून आले.
VIDEO | Chennai: Tamil Superstar Rajinikanth greets fans on Diwali from his Poes Garden residence.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/UkxvwKmMtE
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2025
advertisement
रजनीकांतचा व्हिडीओ व्हायरल
रजनीकांतचा दिवाळी स्पेशल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबत प्रेमाने संवाद साधल्याने, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबाबात नेटकरी रजनीकांतचं कौतुक करत आहेत. 'सुपर थलायवा','हॅपी दिवाली थलायवा' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
advertisement
रजनीकांतचं चाहत्यांना दिवाळी गिफ्ट
view commentsरजनीकांतचा आगामी 'जेलर 2' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक बीटीएस व्हिडिओ दिवाळीनिमित्त खास सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सन पिक्चर्सने सोशल मीडियावर बीटीएस व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे,"सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.'जेलर 2'चा एक खास बीटीएस व्हिडिओ, हॅप्पी दिवाळी." 'जेलर 2'च्या बीटीएस व्हिडिओमध्ये दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध सेटवर मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रजनीकांत नेल्सनला शॉटबद्दल सूचना देताना देखील दिसत आहेत. त्यानंतर एकाचवेळी तीन कार्सचा स्फोट होताना दाखवले आहे. शेवटी रजनीकांत आपल्या खास शैलीत "हॅप्पी दीपावली" म्हणत शुभेच्छा देताना दिसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rajinikanth : नाद करा पण थलायवाचा कुठं! हात जोडून नमस्कार, फ्लाइंग किस; रजनीकांतने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा