केकवर ओतली दारू, लावली आग अन् म्हणाला, 'जय मात दी...'; आता पोलिसांत पोहोचलं प्रकरण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रणबीरबरोबर त्याच्या फॅमिलीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमकं काय झालंय पाहूयात.
मुंबई, 28 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नुकतीच कपूर फॅमिलीची ख्रिसमस पार्टी झाली. या पार्टीत सगळ्यांनी धम्माल केली पण आता ही धम्माल रणबीर कपूरला महागात पडणार असं दिसतंय. रणबीर कपूर आणि त्याच्या फॅमिलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ख्रिसमस पार्टीमध्ये रणबीरनं फायर केकची मज्जा लुटली आणि यावेळी थेट 'जय माता दी' असं बोलला. रणबीरच्या अशा वागण्यानं हिंदू देवतांचा अपमान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
रणबीर कपूर आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय तिवारी नावाच्या एका व्यक्तीनं केली आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत संजय तिवारी यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रणबीर कपूरचा केक फायरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओतून रणबीर हिंदू देवतांचा अपमान करत असल्याची तक्रार संजय तिवारी यांनी केली आहे.
advertisement
कपूर फॅमिली दरवर्षी ख्रिसमस निमित्त एकत्र येते आणि सेलिब्रेशन करते. यंदाचा ख्रिसमस देखील कपूर फॅमिलीसाठी खास होता. कारण यावेळी रणबीरची लेक राहा कपूर या पार्टीमध्ये होती. रणबीर आणि आलिया यांनी ख्रिसमसच्या निमित्तानं राहाचा चेहरा पहिल्यांदा सर्वांसमोर आणला. त्यानंतर कपूर फॅमिलीची पार्टी झाली. या पार्टीमध्ये केक कापताना रणबीरनं केकवर दारू ओतून 'जय माता दी' म्हणताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रणबीरबरोबर इतर कपूर फॅमिली देखील 'जय माता दी' बोलत असल्याचं दिसतंय. त्यामुळे रणबीरबरोबर त्याच्या फॅमिलीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
रणबीर कपूरच्या व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, डायनिंग डेबलवर संपूर्ण कपूर फॅमिली बसली आहे. समोर केक ठेवला आहे. लवकरच फराझ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा जहान कपूर केकवर वाईन ओतताना दिसतोय. तर दुसरीकडे रणबीरच्या हातात लाइटर असून तो लाइटरनं वाईन ओतलेल्या केकला आग लावताना दिसतोय. नंतर रणबीरच्या पाठोपाठ सगळे जय माता दी असं बोलताना दिसत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2023 10:46 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
केकवर ओतली दारू, लावली आग अन् म्हणाला, 'जय मात दी...'; आता पोलिसांत पोहोचलं प्रकरण