जय मातादी! आलियाची ओव्हर अँक्टिंग अन् रणबीरनं लावली थेट केकला आग, 'तो' व्हिडीओ व्हायरल

Last Updated:

रणबीरनं ख्रिसमसच्या दिवशी लेक राहाचा चेहरा सर्वांसमोर आणला. त्यानंतर झालेल्या पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे.

रणबीरनं लावली केकला आग
रणबीरनं लावली केकला आग
मुंबई, 26 डिसेंबर : 2023वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. ख्रिसमस सेलिब्रेशन देखील सुरू आहे. ख्रिसमसच्या दिवशी बॉलिवूड कलाकार देखील एकत्र येत सेलिब्रेशन करताना दिसतात. कपूर फॅमिली या सेलिब्रेशनमध्ये सर्वात पुढे असते. कपूर फॅमिली ही बरीच मोठी आहे त्यामुळे दिवाळी किंवा ख्रिसमचं सेलिब्रेशन करण्यासाठी सगळे एकत्र येतात. ख्रिसमसच्या मुहूर्तावर अभिनेत्री आलिया आणि रणबीर यांनी त्यांची लेक राहा हिचा चेहरा सर्वांसमोर आणला. तर दुसरीकडे सगळ्या कपूर्सबरोबर ख्रिसमची जंगी पार्टी करण्यात आली. पार्टीत रणबीरनं थेट केकलाच आग लावली. फायर केकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रणबीरच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सगळे कपूर्स डायनिंग डेबलवर बसले आहेत.संजय कपूरचा मुलगा जहान कपूर केकवर विस्की ओतताना दिसतेय. तर समोर बसलेल्या रणबीरच्या हातात लाइटर आहे. रणबीर लाइटरची फ्लेम पेटवतो आणि वाइन ओतलेल्या केकवर लावतो आणि केकला हलकीशी आग लागते. कपूर घरातील एका व्यक्तीनं हा व्हिडीओ कॅप्चर केला आहे.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे रणबीरनं वाइन ओतलेल्या केकवर आग लावली आणि आग लागताच जय माताजी म्हणत ओरडला. रणबीर पाठोपाठ घरातील इतर लोक देखील जय मातादी म्हणत ओरडतात. नंतर सगळे मेरी ख्रिसमस म्हणजे शुभेच्छा देतात आणि केक कापतात.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट रणबीरच्या बाजूला बसलेली दिसत आहे. रणबीर केक फायर करत असताना आलिया उगाचच ओव्हर अँक्टिंग करत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
कपूर फॅमिलीच्या ख्रिसमस पार्टीमध्ये बिग बींची नात नव्या नवेली नंदा देखील सहभागी झाली होती. नव्यानं तिच्या सोशल मीडियावर ख्रिसमस पार्टीचे काही फोटो शेअर केलेत. नव्याबरोबर करिष्मा कपूर देखील दिसत आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, राहा कपूर, आदर जैन, करिष्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान. त्याचबरोबर रणधीर कपूर, रीमा जैन, नीला देवी आणि बबीता कपूर देखील फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
जय मातादी! आलियाची ओव्हर अँक्टिंग अन् रणबीरनं लावली थेट केकला आग, 'तो' व्हिडीओ व्हायरल
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement