VIDEO : झुंबर, सोफा आणि बाल्कनी; रणबीर-आलियाचं 2,500,000,000 रुपयांचं घर बनून तयार
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Alia bhatt-Ranbir kapoor New House: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे आयुष्य आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. बॉलिवूडचे हे स्टार कपल लवकरच त्यांच्या 250 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहायला जाणार आहेत.
मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे आयुष्य आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. बॉलिवूडचे हे स्टार कपल लवकरच त्यांच्या 250 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहायला जाणार आहेत. सहा मजली असलेला बंगला बनून तयार आहे. याची झलक समोर आली आहे.
हा बंगला मूळतः राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचा होता. नंतर 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या नावावर गेला. आता रणबीर आणि आलियाने त्याला पुन्हा नव्या रूपात साकारले आहे. त्यामुळे हा बंगला फक्त राहण्याची जागा नाही, तर तीन पिढ्यांच्या आठवणी जपणारे ठिकाण आहे.
advertisement
या घराची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि आधुनिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ. प्रत्येक मजल्यावरून हिरवाईने नटलेली बाल्कनी दिसते. उंच छताची लिव्हिंग रूम, भव्य झुंबर आणि मोठ्या खिडक्या घराला आलिशान लुक देतात.
विशेष म्हणजे हा बंगला कृष्णा राज कपूर यांच्या नावावर आहे आणि तो रणबीर-आलियाच्या मुलगी रिया कपूरसाठी खास गिफ्ट म्हणून नोंदवला जाणार आहे. म्हणजेच हे घर पुढच्या पिढीच्या नावावर असेल. मीडियाने अनेकदा रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांना या घराच्या साइटवर भेट देताना पाहिले आहे. त्यांनी बांधकामाची एक-एक डिटेल स्वतः तपासली. एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, घराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि पुढच्या महिन्यात ते घरात प्रवेश करू शकतात.
advertisement
Ranbir Kapoor’s new bungalow simple and elegant ✨ pic.twitter.com/dkfaLYrkmH
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : झुंबर, सोफा आणि बाल्कनी; रणबीर-आलियाचं 2,500,000,000 रुपयांचं घर बनून तयार


