दारू समजून किटकनाशक प्यायला, 32 वर्षांच्या अभिनेत्याचा मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
एका 32 वर्षांच्या अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाचं कारण अत्यंत धक्कादायक असून त्याच्या निधनाची माहिती मिळताच सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मुंबई : असं म्हणतात मरण कोणाला कधी आणि कसं येईल हे सांगता येत नाही. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बाबतीतही असंच झालं आहे. अभिनेत्याची एक चूक त्याला इतकी महागात पडली की तो थेट मृत्यूच्या दारात जाऊन पडला. एका 32 वर्षांच्या अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाचं कारण अत्यंत धक्कादायक असून त्याच्या निधनाची माहिती मिळताच सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
रणदीप भंगू असं निधन झालेल्या अभिनेत्याचं नाव आहे. हा एक प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. अभिनेत्यानं दारू समजून किटनाशकाचं औषध प्यायलानं त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानं चुकून टिकनाशकाची बाटली तोंडाला लावली आणि होत्याचं नव्हतं झालं. पंजाबी इंडस्ट्रीला अभिनेत्याच्या मृत्यूनं धक्का बसला आहे. अनेक पंजाबी कलाकारांनी अभिनेत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
advertisement
( हेही वाचा - 65 कोटींचं घर अन् महागड्या गाड्यांचा ताफा; 27 व्या वर्षी प्रचंड लक्झरी आयुष्य जगते 'ही' स्टारकिड )
अभिनेता रणदीप भंगूच्या मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्याला काही दिवसांपासून दारूचं व्यसन लागलं होतं. हे व्यसनाचा त्याच्या जीवाशी खेळ झाला. अभिनेता आधीच नशेत होता. त्यात त्यानं शेतात मोटारीवर ठेवलेली किटकनाशकाची बाटली घेतली. ती बाटली दारूची आहे असं समजून त्यानं ती प्यायली. थोड्या वेळातच अभिनेत्याच्या तब्येत ढासळली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
रणदीप भंगू हा पंजाबी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जात होता. गुर करमजीत अनमोल, मलकीत रौनी आणि गुरप्रीत कौर भंगू सारख्या कलाकारांकडून त्यानं प्रेरणा घेतली होती. सिट्टा (2022), दूरबीन (2019) आणि हाल ही में लंबरान दा लाना (2024) सारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यानं काम केलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2024 8:30 AM IST


