Mardaani 3 Collection: 12 वर्षांनतरही राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'चा जलवा, 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली अफलातून कमाई; बजेटची अर्धी रक्कम वसूल
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या 'मर्दानी 3' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या चाहत्यांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या 'मर्दानी 3' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सनी देओलच्या ' बॉर्डर 2'नंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. त्यामुळे राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3'ला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर राणी मुखर्जी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. 'हिचकी'नंतर राणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'मर्दानी 3' दमदार कमाई करताना दिसत असून बॉक्स ऑफिसवर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
यश राज फिल्म्सची हिट फ्रँचायझी असलेल्या 'मर्दानी'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ही बॉलिवूडची आतापर्यंतची एकमेव पोलिस चित्रपट सीरीज आहे. ती 2014 मध्ये प्रदर्शित झाली होती. आता, या फिल्म सीरीजचा तिसरा भाग आला आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' चित्रपट अशावेळी रिलीज झाला, जेव्हा थिएटरमध्ये सनी देओलचा 'बॉर्डर 2' चित्रपट रिलीज झाला आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन करत आहे. दरम्यान, चिरंजीवीचा टॉलिवूड चित्रपट 'मान शंकर वरप्रसाद गरू' हा चित्रपट सुद्धा जानेवारी महिन्यातच रिलीज झाला होता. त्याला देखील प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद दिला जात आहे.
advertisement
या दोन चित्रपटांमध्ये आलेला राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' हा चित्रपट आता थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या विकेंडच्या वेळी चित्रपटाने 17.50 कोटींची कमाई केलेली आहे, तर जगभरात 26.70 कोटींची कमाई केलेली आहे. 'मर्दानी 3' चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 4 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली आहे. अशापद्धतीने एकूण 17.50 कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटाची तीन दिवसांत जेमतेम एकूण कलेक्शन 20.70 कोटी रुपयांची कमाई केली. परदेशात, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत परदेशातून 6 कोटी रुपये कमावले. परिणामी, चित्रपटाने पहिल्या विकेंडला जगभरात एकूण 26.70 कोटी रुपये कमावले आहेत.
advertisement
मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'मर्दानी 3' चे बजेट सुमारे 60 कोटी रुपये इतके आहे आणि त्या तुलनेत, चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत निम्मी कमाई केली आहे. तथापि, चित्रपटाला अजूनही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जर चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी चांगली कामगिरी केली तर तो लवकरच त्याच्या बजेटपर्यंतचा कमाईचा आकडा गाठेल. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस बजेटचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. सध्या, या चित्रपटाची सनी देओलच्या 'बॉर्डर 2' सोबत स्पर्धा सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 4:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mardaani 3 Collection: 12 वर्षांनतरही राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'चा जलवा, 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली अफलातून कमाई; बजेटची अर्धी रक्कम वसूल







