अमेय खोपकरांनी झापलं, 'रणपति शिवराय' सिनेमाबाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय, रिलीज डेट बदलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रणपति शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा 31 जानेवारीला रिलीज होणार होता मात्र सिनेमाची रिलीज डेट आता बदलण्यात आली आहे.
येत्या 31 जानेवारी रोजी रणपति शिवराय स्वारी आग्रा आणि पुन्हा एकदा साडे माडे तीन असे दोन मराठी सिनेमे रिलीज होणार होते. दोन्ही सिनेमांच्या रिलीज डेटवरून निर्मात्यांमध्ये चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. पुन्हा एकदा साडे माडे तीनचे निर्माते अमेय खोपकर यांनी रणपति शिवराय स्वारी आग्राचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर भर कार्यक्रमात टीका केली होती. हे असंच सुरू राहिलं तर बायकॉट करू असं ते म्हणाले होते. दरम्यान अमेय खोपकर यांनी झापल्यानंतर रणपति शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला. 31 जानेवारी ऐवजी सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.
31 जानेवारी रोजी या दोन्हीपैकी एकही मराठी सिनेमा रिलीज होणार नाहीये. रणपति शिवराय स्वारी आग्रा सिनेमाबरोबरच पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमाचं रिलीजही थांबवण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे 28 जानेवारील रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे राज्याच तीन दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याचं पार्श्वभूमीवर दोन्ही सिनेमांचं रिलीज थांबवण्यात आलं. रणपति शिवराय स्वारी आग्रा सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची नवीन रिलीज डेट घोषित केली आहे.
advertisement
आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा सिनेमा आता 6 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
advertisement
advertisement
या सिनेमात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अमेय खोपकरांनी झापलं, 'रणपति शिवराय' सिनेमाबाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय, रिलीज डेट बदलली









