Rekha: रेखा 'या' पाकिस्तानी क्रिकेटरसोबत करणार होती लग्न, मग काय बिनसलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rekha: हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकांपेक्षा जास्त काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा ही फक्त तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील गूढ गोष्टींमुळेही कायम चर्चेत राहिली आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकांपेक्षा जास्त काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा ही फक्त तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील गूढ गोष्टींमुळेही कायम चर्चेत राहिली आहे. तिचं नाव अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. पण तिच्याबद्दल सर्वात मोठा आणि आश्चर्यचकित करणारा किस्सा म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेटरसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं.
1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक जिंकला आणि इम्रान खान एकाच क्षणात सुपरस्टार बनला. त्याचा देखणा लूक, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि लोकप्रियता यामुळे तो महिलांचा लाडका झाला. त्याच काळात रेखा आणि इम्रान खान एकत्र दिसल्याच्या बातम्या गाजू लागल्या. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर त्यांना पाहिलं गेलं आणि लगेचच “दोघं लग्न करणार” अशा अफवा पसरल्या.
advertisement
त्या काळात 'स्टार' या लोकप्रिय वृत्तपत्राने मोठी बातमी छापली होती, “रेखा आणि इम्रान खान विवाहबंधनात अडकणार”. इतकंच नाही, तर रेखाच्या आईलाही इम्रान खूप आवडत होता आणि तिने या नात्याबद्दल ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचं म्हटलं जातं. तिला इम्रान आपला जावई व्हावा, अशी इच्छा होती. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं.
पण हे नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. इम्रान खानचं नाव त्या काळात झीनत अमान, शबाना आझमीसारख्या इतर बॉलिवूड अभिनेत्रींशीही जोडलं गेलं. एका मुलाखतीत त्याने स्वतः कबूल केलं होतं की “मला अभिनेत्रींसोबत वेळ घालवायला आवडतं”. रेखाने कधीच या अफवांवर बोलणं पसंत केलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 7:31 AM IST