आता तक्रार करणं झालं सोपं! कडेगावात 'ई-गव्हर्नन्स'चा अनोखा प्रयोग, सरकारी कामं होणार झटक्यात!

Last Updated:

e-governance : नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी कडेगाव तहसील कार्यालयाने...

AI Image
AI Image
कडेगाव, सांगली : नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी कडेगाव तहसील कार्यालयाने एक अनोखा आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आता नागरिकांना निवेदन किंवा तक्रार दाखल करण्यासाठी QR कोडचा वापर करता येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
QR कोडद्वारे तक्रार कशी नोंदवाल?
या नव्या प्रणालीमुळे आता नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन कागदी अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. आता फक्त एक QR कोड स्कॅन करून, नागरिक त्यांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप नमूद करू शकतील. अर्ज किंवा निवेदन पीडीएफ (PDF) किंवा फोटो स्वरूपात अपलोड करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
advertisement
'ई-गव्हर्नन्स'चा आदर्श
तहसीलदार अजित शेलार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, "आमच्या कार्यालयाचा हा उपक्रम 'ई-गव्हर्नन्स' आणि डिजिटल युगातील प्रशासनाचे आधुनिक स्वरूप आहे. यामुळे नागरिकांना त्यांचे काम अधिक सोप्या पद्धतीने करता येणार आहे." या उपक्रमाचे कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले असून, यामुळे प्रशासकीय कामे अधिक कार्यक्षम आणि सोयीची होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता तक्रार करणं झालं सोपं! कडेगावात 'ई-गव्हर्नन्स'चा अनोखा प्रयोग, सरकारी कामं होणार झटक्यात!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement