Kantara Chapter 1: ‘कांतारा: चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, 10 दिवसांत केली अंधाधुंन कमाई
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Kantara Chapter 1: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ घालत आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ घालत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात इतका घर करून बसला आहे की, दहा दिवस उलटून गेल्यानंतरही त्याच्या कमाईचा वेग कमी होताना दिसत नाही. दमदार कथा, अप्रतिम दिग्दर्शन आणि नेत्रदीपक व्हिज्युअल्स यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये जबरदस्त लोकप्रिय झाला आहे.
ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइट सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘कांतारा: चॅप्टर 1’ ने केवळ 10 दिवसांत ₹396.65 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ₹337.4 कोटींचा गल्ला जमवला, तर दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला देखील त्याची पकड कायम राहिली. दुसऱ्या शनिवारीच 10व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 37 कोटींची कमाई करत विकेंडला पुन्हा उभारी घेतली.
advertisement
पहिला दिवस – 61.85 कोटी
दुसरा दिवस – 45.4 कोटी
तिसरा दिवस – 55 कोटी
चौथा दिवस – 63 कोटी
पाचवा दिवस – 31.5 कोटी
सहावा दिवस –34.25 कोटी
सातवा दिवस – 25.25 कोटी
आठवा दिवस – 21.15 कोटी
advertisement
नववा दिवस – 22.25 कोटी
दहावा दिवस – 37.00 कोटी
एकूण: 396.65 कोटी
‘कांतारा: चॅप्टर 1’ हा देशभरात तुफान गाजतोय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रिन थिएटरमध्येही हाऊसफुल बोर्ड लावले आहेत.
हा सिनेमा 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ नंतर ‘कांतारा: चॅप्टर 1’ या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय कमाईच्या बाबतीत हा चित्रपट ‘सैयारा’ आणि ‘छावा’ नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘कांतारा: चॅप्टर 1’ सध्या ज्या वेगाने बॉक्स ऑफिसवर धावत आहे, त्यावरून तो लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल, असं वाटतंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kantara Chapter 1: ‘कांतारा: चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, 10 दिवसांत केली अंधाधुंन कमाई