advertisement

Bigg Boss Marathi Season 5 : रितेशने दाखवला 'गावठी बिग बॉस', Reel Star रॉक, घरातले शॉक

Last Updated:

अनेक रील स्टार्स्टना त्याचे रील्स पाहून काम मिळाली आहेत. अशाच एका रील स्टारच्या मेहनतीच सोनं झालं. त्याचा व्हिडीओ थेट मराठी बिग बॉसमध्ये दाखवण्यात आला.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात सध्या इन्स्टाग्राम हे परभावी माध्यम म्हणून समोर येत आहे. इन्स्टाग्रामवर उपलब्ध होत असलेल्या वेगवेगळ्या कॉन्टेंटकडे युझर्सचं आकर्षण आहे. रील हा प्रकार इन्स्टाग्रामवर प्रामुख्यानं पाहिला जातोय. अनेक इन्फ्युएन्सर रीलसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. अनेक रील स्टार्स्टना त्याचे रील्स पाहून काम मिळाली आहेत. अशाच एका रील स्टारच्या मेहनतीच सोनं झालं. त्याचा व्हिडीओ थेट मराठी बिग बॉसमध्ये दाखवण्यात आला.
बिग बॉस मराठीच्या घरात विकेंडला भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना त्यांची बाहेर किती पॉप्युलॅरिटी आहे हे दाखण्यात आलं. रितेशनं निक्की आणि सूरज यांना त्यांच्यावर तयार करण्यात आलेला गावठी बिग बॉसचा व्हायरल व्हिडीओ दाखवण्यात आला. निक्की, अरबाज आणि सूरज यांचा संभाषणाचा एक व्हिडीओ रिक्रिएट करण्यात आला होता. ज्यात ड्युप्लिकेट अत्यंत फनी अरबाज आणि निक्की तयार करण्यात आले.
advertisement
रील्स पाहणाऱ्या अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल. पवन जाधव या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. काही दिवसात हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला. आपला व्हिडीओ जेव्हा बिग बॉसमध्ये दाखवल्याचं पाहिलं तेव्हा पवन जाधव याला झालेला आनंद काही औरच होता.त्यानं व्हिडीओ शेअर आनंद व्यक्त केला.
advertisement
रील स्टार पवन जाधव यानं व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, "कष्टाचं फळ, धक्काच बसला. दररोज जे बिग बॉस टीव्हीसमोर बसून बघतोय. त्यात आपला व्हिडीओ दाखवला. खरंच शब्दच नाहीत माझ्या फॅन लोकांचे आभार मानायला. हे तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालंय. प्रॉउड ऑफ माय टीम आणि माझी इन्स्टा फॅमिली. वयाच्या आठव्या वर्षी दाद्या आणि चौदाव्या वर्षी श्री (आर्ची) हे माझे दोन वाघ टीव्हीवर दिसले. खरंच आज माझी मेहनत कामी आली. जिंकलो".
advertisement
पवन जाधव हे अनेक महिने इन्स्टाग्रामवर रील्स बनवतात. अनेकांचे डायलॉग लिपक्सिंग करतात. बिग बॉस सुरू झाल्यापासून सूरज चव्हाणच्या डायलॉगवर ते फनी व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओला लाखोंची पसंती मिळतेय. गावठी बिग बॉस असं त्यांनी त्यांच्या व्हिडीओला नाव दिलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi Season 5 : रितेशने दाखवला 'गावठी बिग बॉस', Reel Star रॉक, घरातले शॉक
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement