Riteish Deshmukh: 'जिवाला तुझी आस लागली..' आषाढी एकादशी निमित्त रितेश देशमुखची भक्तीमय पोस्ट

Last Updated:

Riteish Deshmukh Ashadhi ekadashi Post: आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांची पावले पंढरपूरकडे वळली आहेत.

आषाढी एकादशी निमित्त रितेश देशमुखची भक्तीमय पोस्ट
आषाढी एकादशी निमित्त रितेश देशमुखची भक्तीमय पोस्ट
मुंबई :  आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांची पावले पंढरपूरकडे वळली आहेत. वारकरी संप्रदायाचा हा महापर्व दिवस असल्याने पंढरपूर नगरीत विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात भक्तिरस ओसंडून वाहतो आहे.पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासून महापूजा, कीर्तन, अभंगवाणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची पूजा करून राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखनेही एक खास पोस्ट शेअर केली आहे.
रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्याच लई भारी चित्रपटातील माऊली गाण्यातील ओळी लिहिल्या आहेत.
रितेशची पोस्ट
रितेशने लिहिलं, "भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... उभी पंढरी आज नादावली... तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली... आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!".
advertisement
Riteish Deshmukh
रितेश देशमुख आषाढी पोस्ट
दरम्यान, यंदा जवळपास 20 लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाले असून, अनेक दिंड्या 15-20 दिवसांचा पायी प्रवास करून येथे पोहोचल्या आहेत. या एकादशीच्या दिवशी भाविक उपवास ठेवून विष्णू वा विठोबाची पूजा करतात. तुलशी पत्र, गंध, फुले अर्पण करून अभंग गातात. याच वेळी भाविक भगवद्गीता किंवा विष्णुसहस्रनामाचे पठणही करतात. भव्य याञा, ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'माऊली-माऊली'च्या घोषात आषाढी एकादशीचा उत्सव पहायला मिळतो.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Riteish Deshmukh: 'जिवाला तुझी आस लागली..' आषाढी एकादशी निमित्त रितेश देशमुखची भक्तीमय पोस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement