अनुष्कासोबत केला होता रोमान्स, शाहरुखचं 17 वर्षांआधीच ते रोमँटीक गाणं, 1,30,00,00,000 लोकांनी पाहिलंय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Bollywood Song : शाहरुख आणि अनुष्का शर्मा लीड असलेला 'रब ने बना दी जोडी' नावाचा चित्रपट 2008 ला आला होता.या चित्रपटात एक गाणं खूपच गाजले होते. ते गाणं 1,30,00,00,000 (130 कोटी)लोकांनी पाहिलं.
बॉलिवूडमध्ये कायम नवे नवे चित्रपट येत असतात. पण त्यातली गाणीच लोकांच्या लक्षात राहतात. कित्येक गाणी आहेत जी आपण कायम गुणगुणत असतो. शाहरुख आणि अनुष्का शर्मा लीड असलेला 'रब ने बना दी जोडी' नावाचा चित्रपट 2008 ला आला होता. तो एक रोमँटिक चित्रपट होता. त्याचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. अनुष्का शर्माचा हा डेब्यू चित्रपट होता.
या चित्रपटाने अनुष्का शर्माला अभिनेत्री म्हणून ओळख दिली. या चित्रपटाने सुपरहिट गाणी दिली होती, सोबतच शाहरुख अनुष्काचा रोमान्स पाहायला मिळाला होता. ज्यामुळे हा चित्रपट अजूनच चाहत्यांच्या पसंतीस पडला. या चित्रपटात 'तुझमें रब दिखता है' हे गाणं खूपच गाजले. या गाण्याचे संगीत हे सलीम-सुलेमान यांनी दिले होते, तर आवाज हा गायक कुमार राठोड यांचा होता. या गाण्याला यूट्यूबवर आता पर्यंत 1,30,00,00,000 ( 130 कोटी) लोकांनी पाहिले. या गाण्यासोबतच 'डांस पे चांस' आणि 'हौले हौले' सारखी गाणीही सुपरहिट झाली होती.
advertisement
या चित्रपटात पंजाब मधील एक सामान्य आणि प्रामाणिक व्यक्ती सुरिंदर साहनी म्हणजेच शाहरुखने केलेली भूमिका जो सरकारी नोकर असतो. त्याचे जीवन शांत आणि निरागस असते. जेव्हा त्याच्या आयुष्यात तानी येते तेव्हा तो तिच्याशी लग्न करतो. तानीचे अगोदर लग्न ठरलेलं असते, पण तो अगोदरच मरतो. त्यामुळे तिच्या वडिलांची इच्छा अपुरी राहते. त्यामुळे सुरिंदर साहनी तिच्याशी लग्न करतो. इतकी साधी गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे.
advertisement
'रब ने बना दी जोडी' ने 11 अवॉर्ड जिंकले
view commentsया चित्रपटाने खूपच प्रसिद्धि मिळवली. या चित्रपटाने चक्क 11 अवॉर्ड जिंकले. आईएमडीबीला या चित्रपटाला 7.2 रेटिंग मिळाली. हा रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनूसार या चित्रपटाने भारतात 117.61 कोटी कमवले. जगभरात या चित्रपटाला एकूण 151.58 कोटी रुपये मिळाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अनुष्कासोबत केला होता रोमान्स, शाहरुखचं 17 वर्षांआधीच ते रोमँटीक गाणं, 1,30,00,00,000 लोकांनी पाहिलंय


