12 तासांत बॉलिवूडला दोन धक्के! सुलक्षणा पंडितनंतर आणखी एका अभिनेत्रीचं निधन, इंडस्ट्रीवर शोककळा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मागील 12 तासात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले आहेत. दोन गुणी अभिनेत्रींनी या जगाचा निरोप घेतला आहे. सुलक्षणा पंडित यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालंय.
प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाची माहिती ताजी असताना मनोरंजन विश्वावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला. 12 तासात बॉलिवूडला दोन धक्के बसले आहेत. अभिनेत्री सुलक्षणा यांच्यानंतर अभिनेत्री जरीन खान यांचं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
जरीन खान यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांनी कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. जरीन खान यांनी मृत्यूच्या तीन महिने आधी म्हणजेच जुलै महिन्यात त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. मुलगी सुजैन खानने त्यांचे कँन्डिड फोटो शेअर केले होते.
advertisement
जरीन खान यचा बॉलिवूडच्या प्रसिद्ध घरातून होत्या. प्रसिद्ध अभिनेते संजय खान हे त्यांचे पती होते. अभिनयाबरोबरच जहीरन खान या प्रसिद्ध डिझाइनरही होत्या. कुकबुकच्या लेखिका होत्या. त्यांचा जन्म 12 जुलै 1944 साली एका बंगळुरू पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं नाही. शाळेनंतर त्यांनी क्रिएटिव्ह आणि बिझनेस वर्ल्डमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
advertisement

1960 च्या दशकात त्यांनी इंडस्ट्रीत डेब्यू केला. 1963 साली त्यांनी तेरे घर के सामने या सिनेमातून डेब्यू केला. तीन वर्षांनी 1966 त्यांनी अभिनेते संज खान यांच्याशी लग्न केलं. त्यांना सुजैन खान, सिमॉन अरोरा, फराह अली खान आणि जायद खान अशी मुलं आहेत. सुजैन खान हिने अभिनेता ऋतिक रोशनशी लग्न केलं. राकेश रोशन आणि संजय खान हे फॅमिली फ्रेंड्स आहेत. पण ऋतिक आणि सुजैन यांचा संसार काही वर्षात मोडला. सुजैन आता तिच्या बॉयफ्रेंडबरोबर तर आणि ऋतिक त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर दिसतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
12 तासांत बॉलिवूडला दोन धक्के! सुलक्षणा पंडितनंतर आणखी एका अभिनेत्रीचं निधन, इंडस्ट्रीवर शोककळा


