Suraj chavan Family: आत्या आणि बहिणींना पाहून गोलीगत सूरज भावूक, मिठी मारताच कोसळलं रडू!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे तर काहींना ट्रोल केलं जात आहे. अशातच घरातील स्पर्धक गोलीगत सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. लोकांना त्याचा साधेपणा प्रभावित करत आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे तर काहींना ट्रोल केलं जात आहे. अशातच घरातील स्पर्धक गोलीगत सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. लोकांना त्याचा साधेपणा प्रभावित करत आहे. अशातच आज फॅमिली वीकमध्ये सूरज चव्हाणचे जवळचे लोक येणार आहेत, त्यामुळे त्याला सुखद धक्का मिळणार आहे सोबतच अश्रूही अनावर होताना दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोनेच प्रेक्षक भावूक झाले आहेत.
आजच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण प्रेक्षकांना रडताना दिसून येईल. त्यामुळे सूरजसह प्रेक्षकदेखील भावूक झालेले पाहायला मिळतील. 'बिग बॉस मराठी'च्या नवा प्रोमो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रोमोमध्ये, 'बिग बॉस' म्हणत आहेत, ''सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं''. सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत, ''तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे.'' सूरजला 'बिग बॉस मराठी'च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
सूरज चव्हाणची आत्या आणि बहिणी जेव्हा घरात एन्ट्री घेतात तेव्हा त्यांच्या साधेपणाने प्रेक्षकांचं मन जिंकल. त्यांनी घरात येताच चप्पल काढली. त्यांच्यातील साधेपणा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. प्रोमो व्हिडिओवर लोक कमेंट करून तेदेखील भावनिक झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सूरजला रडताना पाहून प्रेक्षकही रडत आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. घरातील स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंब, जवळचे लोक येत आहेत. त्यामुळे घरात सध्या खूप भावनिक वातावरण झालंय. घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2024 4:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj chavan Family: आत्या आणि बहिणींना पाहून गोलीगत सूरज भावूक, मिठी मारताच कोसळलं रडू!