जागेवरून उठताही येईना, अभिनेत्री श्रद्धा कपूरची अशी अवस्था; झालंय तरी काय? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री श्रद्धा कपूरला जागेवरून उठताही येतच नाहीये. तिची अशी अवस्था का झाली? श्रद्धा कपूरला झालंय तरी काय? तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं.
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. श्रद्धा कपूर चालणं सोडा, जागेवरून उठताही येत नाहीये. श्रद्धा एका जागेवर बसून आहे. तिच्या चाहत्यांना ही माहिती मिळताच त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रद्धाने स्वत: व्हिडीओ शेअर करत तिची हेल्थ अपडेट दिली आहे.
श्रद्धा कपूरचा अपघात झाला असून तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. श्रद्धाचा पाय फ्रॅक्चर करण्यात आला असून तिला चालणं देखील कठीण झाला आहे. श्रद्धाने व्हिडीओ शेअर करत तिच्या पायाला नेमकं काय झालं आहे आणि तिच्या पायाची परिस्थिती काय आहे हे सांगितलं. श्रद्धाच्या पायाची झालेली अवस्था पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
श्रद्धा कपूर सध्या लक्ष्मण उतेकर यांच्या विठा या सिनेमाचं शूटींग करत आहे. या शूटींगदरम्यान श्रद्धाचा अपघात झाला. नाशिकच्या औंधेवाडी गावाजवळ विठा सिनेमाचं शूटींग सुरू आहे. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमातील एक लावणी सीन शूट करतेवेळी श्रद्धाच्या पायाला दुखापत झाली. तिच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमातील लावणी सीन दरम्यान एका म्युझिक बीट कॅच करताना श्रद्धाला ही दुखापत झाली. श्रद्धाने यावेळी हेवी ज्वेलरी आणि कंबरपट्ट घातला होता. हे सगळं घालून ती डान्स करत होती, अशातच तिचं संपूर्ण वजन तिच्या डाव्या पायावर पडलं तिचा तोल गेला आणि ती पडली. तिला पाय फ्रॅक्चर झाला.
श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत झाल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी शूटींग शेड्यूल पोस्टपोन केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धा ठीक झाल्यानंतर पुन्हा शूटींग केलं जाणार आहे.
advertisement
advertisement
दरम्यान श्रद्धाने व्हिडीओ शेअर करत तिच्या पायाची अपडेट दिली. ती म्हणाली, "माझ्या पायाची दुखापत आता कशी आहे... मी टर्मिनेटरसाखखी फिरतेय. मसल्स टीइर आहे. ठीक होईल. फक्त आराम करायचा आहे. पण मी हेल्दी आहे लवकर बरी होईन." श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांची चिंता मिटली आहे.
श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती शेवटची 'स्त्री 2' या सिनेमात दिसली होती.. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई केली. सिनेमात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ति खुराना हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जागेवरून उठताही येईना, अभिनेत्री श्रद्धा कपूरची अशी अवस्था; झालंय तरी काय? VIDEO


