गुढीपाडव्याला सिद्धार्थ चांदेकरनं दिली Good News! VIDEO तून दाखवली पहिली झलक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सिद्धार्थ चांदेकरने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घरात गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं. सिद्धार्थच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मराठी मालिका आणि सिनेमानंतर ओटीटी विश्वातही आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात आणि नव्या गोष्टींचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत मंगल दिवस मानला जातो. याच दिवशी सिद्धार्थने देखील गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. पण ही गुढी त्याने त्याच्या नव्या घरात उभी करत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
सिद्धार्थ चांदेकर याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सिद्धार्थने नवीन घर घेतलं असून यंदाचा गुढीपाडवा त्याने आपल्या नव्या घरात साजरा केला. या खास क्षणाचा व्हिडीओ त्याची पत्नी मिताली मयेकरने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
मितालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घर अजून पूर्णपणे तयार नसल्याचं दिसतं, मात्र त्या अपूर्ण घरातही त्यांनी आनंदाने गुढीपाडवा साजरा केला. उंच इमारतीतील या घरातून दिसणारा सुंदर व्ह्यू चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मिताली मयेकरनं व्हिडीओ शेअर केला आहे. तिने लिहिलं, "नवं वर्ष, नवं घर, नवी सुरुवात! गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!"
advertisement
सिद्धार्थ आणि मिताली ही जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो.त्यांच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
advertisement
सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्याचा 'क्रांतिज्योती विद्यालय : मराठी माध्यम' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. याशिवाय त्याने अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत 'मिसेस देशपांडे' या सीरिजमध्येही काम केलं आहे.
मिताली मयेकरबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'फसक्लास दाभाडे' या सिनेमात झळकली होती. सध्या ती टेलिव्हिजनपासून थोडी दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते आणि तिच्या पोस्टमुळे चाहत्यांशी कनेक्ट राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 12:46 PM IST









