VIDEO : एकदम कडक! या नव्या मालिकेत पाहता येणार 25 वर्षांपूर्वीचा सुबोध भावे; प्रोमो पाहून उडाले प्रेक्षकांचे फ्युज
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
सुबोध भावे देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झाला आहे. त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काय आहे त्यात नवीन जाणून घ्या.
मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचा सपाटा सुरु आहे. प्रत्येक वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होत आहेत. नवनवीन कथा आणि पात्रांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहिन्या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतंय. अशातच आता सोनी मराठी वाहिनीवर एक आगळावेगळा प्रयोग होणार आहे. त्यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काय आहे त्यात नवीन जाणून घ्या.
अशातच आता सुबोध भावे देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झाला आहे. सुबोध याआधी झी मराठीच्या 'तुला पाहते रे' मालिकेत झळकला होता. त्याचं विक्रांत सरंजामे हे पात्र तुफान गाजलं होतं. आता सुबोध पुन्हा दमदार कमबॅक करणार आहे. सुबोधच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. सोनी मराठीवर सुरु होणाऱ्या या मालिकेचं नाव 'तू भेटशी नव्याने' असं आहे. यात सुबोधसोबत अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
advertisement
या मालिकेची खासियत म्हणजे यात 25 वर्षांपूर्वीच्या सुबोध भावेला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक चकितच झाले आहेत. तसंच प्रोमो पाहून सुबोध डबल रोल साकारणार की काय अशी अपेक्षा देखील चाहत्यांना आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, 'मालिकेची नायिका एक डायरी वाचत असते. त्यातील मजकूर वाचून ती म्हणते की, 'वॉव अख्खं कॉलेज माहीची वाट पाहायचं. माही कॉलेजची जान होता.' ती असं म्हणत असताना कडक शिस्तीच्या अभिमन्यू एन्ट्री होत असते. ही भूमिका सुबोध करत असून तो बाइकवरुन एन्ट्री करतो'
advertisement
तर याच प्रोमोच्या पुढच्या भागात, त्याच कॉलेजमधील 25 वर्षांपूर्वी घडलेली घटना दाखवण्यात आलीय, ज्यात माहीची झलक पाहायला मिळाली. हा 25 वर्षांपूर्वीचा माही दुसरा तिसरा कोणी नसून सुबोधचआहे. या मालिकेतुन पहिल्यांदा मराठी मनोरंजनविश्वात आगळावेगळा प्रयोग होताना दिसत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करुन 24 वर्षांपूर्वीचा तरुण सुबोध दाखवण्यात आला आहे. सुबोधच्या या नव्या मालिकेच्या प्रोमोवर खूप प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
advertisement
सुबोध भावेला या आगळ्या रूपात पाहण्यासाठी चाहते आता खूपच आतुर झाले आहेत. अल्पावधीतच 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच सुबोधसोबत शिवानी सोनार देखील एका विद्यार्थिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवानी शेवटची 'सिंधुताई माझी आई' या मालिकेत झळकली. पण प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्यानं ही मालिका मध्येच बंद झाली. त्यानंतर आता शिवानी सोनार पुन्हा एकदा नव्या कोऱ्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2024 11:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : एकदम कडक! या नव्या मालिकेत पाहता येणार 25 वर्षांपूर्वीचा सुबोध भावे; प्रोमो पाहून उडाले प्रेक्षकांचे फ्युज









